घरमुंबईAshraya Scheme : रखडलेल्या आश्रय योजनेतील घरांपासून हजारो सफाई कर्मचारी आजही वंचित

Ashraya Scheme : रखडलेल्या आश्रय योजनेतील घरांपासून हजारो सफाई कर्मचारी आजही वंचित

Subscribe

पालिकेच्या 30 ठिकाणी कर्मचारी वसाहती आहेत. मात्र सध्याच्या स्थितीत एकही काम पूर्णत्वाला गेल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे या सफाई कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी पालिकेकडून चांगली घरे मिळण्यापासून आणखीन काही वर्षे वंचित राहावे लागणार आहे. मुंबई महापालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात पालिकेच्या 27 हजार 900 सफाई कर्मचाऱ्यांना आश्रय योजनेच्या अंतर्गत 4.00 चटई क्षेत्र वापरून 30 वसाहतींचा पुनर्विकास करण्यात येणार असल्याचे सूतोवाच पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी केले आहे.

मुंबई : मुंबई शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी महापालिकेचे 28 हजार कर्मचारी आणि काही प्रमाणात कार्यरत कंत्राटी कर्मचारी हे दिवस- रात्र सफाईची कामे करीत असतात. या सफाई कर्मचाऱ्यांना अनेक लहान- मोठ्या आजारांनी ग्रासलेले असते. त्या आजारपणातच अनेकांचे बळी जातात. मात्र, या सफाई कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी चांगली घरे, घराभोवती स्वच्छ वातावरण मिळत नाही. आतापर्यंत पाच हजार कर्मचाऱ्यांना त्यासाठी घरे देण्यात आलेली आहेत, असा दावा पालिकेने केला आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून सफाई कर्मचारी ‘आश्रय योजनेच्या अंतर्गत घरे’ चांगली पक्की घरे मिळण्यापासून आजही 22 हजार कर्मचारी वंचित आहेत. (Ashraya Scheme Thousands of sanitation workers are still deprived of houses under the stalled Ashraya Scheme)

पालिकेच्या 30 ठिकाणी कर्मचारी वसाहती आहेत. मात्र सध्याच्या स्थितीत एकही काम पूर्णत्वाला गेल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे या सफाई कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी पालिकेकडून चांगली घरे मिळण्यापासून आणखीन काही वर्षे वंचित राहावे लागणार आहे. मुंबई महापालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात पालिकेच्या 27 हजार 900 सफाई कर्मचाऱ्यांना आश्रय योजनेच्या अंतर्गत 4.00 चटई क्षेत्र वापरून 30 वसाहतींचा पुनर्विकास करण्यात येणार असल्याचे सूतोवाच पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी केले आहे. अंदाजे 12 हजार घरे (किमान 300 चौ.फूट) बांधून देण्यासाठी काही ठिकाणी कामे सुरू आहेत. या कामांसाठी पालिकेने सन 2023- 24 च्या सुधारित अर्थसंकल्पात 400 कोटी रुपये तर 2024 – 25 चा अर्थसंकल्पात 1,055 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मात्र यंदाच्या वर्षात आश्रय योजनेची अंमलबजवणी कशा प्रकारे होणार, किती प्रमाणात होणार, त्यामधून नेमकी किती घरे उपलब्ध होणार हे वर्षाच्या शेवटच्या सत्रात समोर येणार आहे.

- Advertisement -

मात्र सफाई कर्मचाऱ्यांना पालिकेकडून घरांबाबत खूपच अपेक्षा आहेत. त्या यंदा काही प्रमाणत पूर्ण होणार की त्यावर पाणी फिरणार हे कालांतराने समोर येणारच आहे. त्यातून पालिकेला सफाई कर्मचाऱ्यांची किती चाड आहे, त्यांच्याबाबत किती सहानुभूती आहे, तेही स्पष्ट होणार आहे.

महापालिकेच्या 30 वसाहतींची सद्यस्थिती

प्रथम टप्प्यात आश्रय योजनेच्या अंतर्गत ‘ए’ विभागात कोचिंग स्ट्रीट, आर/ दक्षिण विभागात पॉवेलस लँड आणि ‘ई’ विभागात सिद्धार्थनगर (टप्पा- 1) येथील पुनर्वसनाचे काम पूर्ण झाले असून, त्याचे हस्तांतरण घनकचरा खात्याला करण्यात आले आहे, असा दावा पालिकेने केला आहे. तसेच, टप्पा- 1 अंतर्गत एफ/दक्षिण विभागात गौतमनगर, ‘ई’ विभागात टँकपाखाडी येथील वसाहतीच्या पुनर्विकासाचे काम प्रगतीपथावर आहे. एच /पश्चिम विभागात हसनाबाद लेन येथील वसाहतीच्या पुनर्विकासासाठी कंत्राटदारास कार्यादेश देण्यात आले आहेत, असे महापालिकेने म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Kalyan Firing : महेश गायकवाड यांच्यावर गोळीबाराआधी ‘त्याच’ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!

महापालिकेच्या कुर्ला, माहिम, जुहू, देवनार, चेंबूर, मालाड, अंधेरी आदी 30 ठिकाणी कामगार वसाहती आहेत. या 30 ठिकाणांच्या पुनर्विकासासाठी कंत्राटदारांना कार्यादेश देण्यात आले आहेत. त्यापैकी 3 ठिकाणी अस्तित्वात असलेल्या जुन्या इमारतींच्या निष्कासनाची कार्यवाही सुरू आहे. उर्वरित 12 ठिकाणी घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत सेवा सदनिका धारकांना स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 15 ठिकाणी पुनर्विकासाची कामे सुरू असून काम सुरू झालेल्या 15 ठिकाणांपैकी 7 स्थानांवर तळमजला किंवा त्यावरील मजल्यांची कामे प्रगतीपथावर आहे. 3 स्थानांवर पायाभरणीचे काम सुरू आहे आणि 5 स्थानांवर चौथरा बांधण्याचे काम पूर्ण झाले आहे, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.

हेही वाचा : Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळाने आज घेतलेल्या निर्णयांची A to Z माहिती एका क्लिकर

राजकीय व प्रशासकीय इच्छा शक्तीचा अभाव- रमाकांत बने

संपूर्ण मुंबई शहराची घाण साफ करणाऱ्या हजारो सफाई कर्मचाऱ्यांना हक्काची घरे महापालिकेने देणे अभिप्रेत होते. कारण की, पालिकेकडे तब्बल 92 हजार कोटी रुपयांपर्यंत मुदत ठेवी होत्या. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून मुंबई महापालिकेचा नावलौकिक आहे. आता तर पालिकेचा अर्थसंकल्प हा तब्बल 59 हजार कोटींवर गेला आहे. तत्पूर्वी गतवर्षी 52 हजार कोटींवर अर्थसंकल्प होता.

पालिकेचे अनेक भूखंड आहेत. म्हणजे पालिकेकडे मुबलक पैसा व जागाही असताना केवळ राजकीय आणि प्रशासकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याने आजपर्यंत या सफाई कर्मचाऱ्यांना आश्रय योजनेच्या अंतर्गत घरे देण्यात आलेली नाहीत. गेल्या अनेक वर्षांपासून सफाई कर्मचाऱ्यांना फक्त सफाई कामांसाठी दिवस रात्र राबवून घेतले आणि आजही स्वच्छता मोहिमेत पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत राबवून घेतले जात आहे. मात्र त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना राहण्यासाठी चांगली घरे देण्याबाबत पालिकेची अक्षम्य अनास्था कारणीभूत आहे, अशी खरमरीत टीका कामगार नेते रमाकांत बने यांनी केली आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, पालिकेने प्राधान्याने सफाई कर्मचाऱ्यांना घरे द्यायला पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -