घरमुंबईAtal Setu : टोल रेट कार्ड पाहून वाहनचालकांचे डोळे चक्रावले; लहान वाहनांसाठी...

Atal Setu : टोल रेट कार्ड पाहून वाहनचालकांचे डोळे चक्रावले; लहान वाहनांसाठी महिना 12500 तर मोठ्यांसाठी…

Subscribe

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (12 जानेवारी) देशातील सर्वात लांब सागरी सेतू अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचे उद्घाटन केले. अटल सेतुवरून आजपासून वाहतुक सुरू झाली आहे. मात्र या सेतुवरून प्रवास करण्याचा विचार करणाऱ्या वाहन चालकांचे महिन्याचा पास पाहून डोळे चक्रावले आहेत.  (Atal Setu Seeing the toll rate card the eyes of motorists got dizzy 12500 per month for small vehicles and for big ones 79000)

हेही वाचा – Narayan Rane: शंकराचार्यांनी हिंदू धर्मासाठी कोणतं योगदान दिलं, ते सांगावं; नारायण राणेंचं आव्हान

- Advertisement -

अटल सेतु 17,840 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे. दक्षिण मुंबई ते नवी मुंबईतील न्हावा-शेवा यांना जोडणाऱ्या या पुलावरून आता 2 तासांचा प्रवास अवघ्या 20 मिनिटांत पूर्ण होणार आहे. हा 6 लेनचा ट्रान्स हार्बर पूल 21.8 किलोमीटर लांब आहे. यात 16.5 किमी लांबीचा सागरी मार्ग आहे. हा पूल सुरू झाल्याने मुंबई-पुणे प्रवासही कमी झाला आहे. या पुलावरून प्रवास करताना किती टोल भरावा लागेल, याबद्दल जाणून घेऊया…

लहान वाहनांसाठी महिन्याचा पास 20 हजार

अटल सेतूवरून प्रवास करताना प्रत्येकाला टोल टॅक्स भरावा लागणार आहे. तुम्ही जर कारने प्रवास केल्यास तुम्हाला 250 रुपये टोल भरावा लागेल, मात्र परतीच्या प्रवासासाठी तुम्हाला 375 रुपये मोजावे लागतील. याशिवाय तुम्हाला 625 रुपयांमध्ये दैनिक पास मिळू शकतो. तर, मासिक पास 12,500 रुपयांचा असेल. मिनी बससाठी सिंगल ट्रॅव्हल टोल टॅक्स 400 रुपये आहे. तर, परतीचा प्रवासासाठी 600 रुपये आणि दैनिक पास 1000 रुपये आणि मासिक पास 20,000 रुपये आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Ayodhya Ram Mandir : निमंत्रण मिळाले नसले तरी अयोध्येला नक्की जाणार, पण…; शरद पवारांचे मोठे भाष्य

मोठ्या वाहनांसाठी महिन्याचा पास 79 हजार

अटल सेतूवरून बस किंवा 2 एक्सल ट्रक गेल्यास सिंगल ट्रॅव्हल टोल 830 रुपये आणि परतीच्या प्रवासासाठी 1245 रुपये, तर दैनिक पास 2075 रुपये आणि मासिक पास 41,500 रुपये आहे. MAV (3 एक्सल) ट्रकसाठी, सिंगल ट्रॅव्हल टोल 905 रुपये आणि परतीचा प्रवासासाठी 1360 रुपये, तर दैनिक पास 2265 रुपये आणि मासिक पास 45,250 रुपये आहे. 4 ते 6 एक्सलच्या MAV साठी, सिंगल ट्रॅव्हल टोल 1300 रुपये आणि परतीच्या प्रवासाचा टोल 1950 रुपये, तर दैनिक पास 3250 रुपये आणि मासिक पास 65,000 रुपये आहे. याशिवाय मोठ्या आकाराच्या वाहनासाठी एकेरी प्रवास टोल 1580 रुपये आणि परतीचा प्रवासासाठी 2370 रुपये, तर दैनिक पास 3950 रुपये आणि मासिक पास 79,000 रुपये आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -