घरमहाराष्ट्रमोदींकडून विकासकामांचे उद्घाटन, मात्र Aaditya Thackeray यांचा पुण्यातील 'या' मुद्द्यावरून सरकारवर निशाणा

मोदींकडून विकासकामांचे उद्घाटन, मात्र Aaditya Thackeray यांचा पुण्यातील ‘या’ मुद्द्यावरून सरकारवर निशाणा

Subscribe

मुंबई : 30 हजार 500 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (12 जानेवारी) यांनी केले. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी देशातील सर्वात लांब अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचे उद्घाटन केले. असे असले तरी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. (Modi inaugurates development works but Aaditya Thackeray targets government over Pune issue)

हेही वाचा – Ram Mandir : शंकराचार्यांवरील ‘त्या’ वक्तव्यानंतर नारायण राणे यांचे अवघ्या तासाभरात घुमजाव; म्हणाले…

- Advertisement -

आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करताना म्हटले की, पूर्ण तयार असलेल्या MTHL उद्घाटनासाठी 3 महिने महाराष्ट्राला ताटकळत ठेवल्यावर काल शेवटी त्याचे उद्घाटन झाले. पूर्ण तयार झाल्यानंतर जवळपास 9 महिन्यांनी दिघा रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करण्यात आले. उरण रेल्वे मार्गही अनेक महिन्यांपासून तयार असूनही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होता. आणि आपण करदाते म्हणून केवळ त्याचीच वाट पाहिली नाही, तर कार्यक्रम, जाहिराती आणि इतर अनेक गोष्टींचा खर्च उचलला. देखभाल आणि स्वच्छतेसाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदारांची, वीजेची बिलं भरली, तीही या सुविधा आपल्या वापरासाठी उघडलेल्या नसतानाही, अशी बोचरी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

हेही वाचा – Atal Setu : टोल रेट कार्ड पाहून वाहनचालकांचे डोळे चक्रावले; लहान वाहनांसाठी महिना 12500 तर मोठ्यांसाठी…

- Advertisement -

महाराष्ट्रावर इतका अन्याय का होतो? – आदित्य ठाकरे

महाराष्ट्रावर इतका अन्याय का होतो? पायाभूत सुविधांचा साधासा प्रकल्प नागरिकांना वापरता यावा, यासाठीही एवढा संघर्ष का करावा लागतो? आमच्या हक्काच्या सोयींचा वापर करण्याचा अधिकार मिळावा म्हणून आक्रोश का करावा लागतो? आता इतकंच सांगा की, पुणे विमानतळाची नवीन टर्मिनल इमारत वापरासाठी कधी उघडली जाईल? असा प्रश्नांचा भडीमार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -