घरमुंबईवैयक्तिक कामांसाठी मंत्रालयाच्या भेटी टाळा

वैयक्तिक कामांसाठी मंत्रालयाच्या भेटी टाळा

Subscribe

औषध मानके नियंत्रण संस्थेतील अधिकारी आणि कर्मचारी वैयक्तिक कामासाठी मंत्रालयामध्ये फेऱ्या मारतात. या दरम्यान कार्यालयातील कामकाज ठप्प पडते. तर, काही कामांची स्वरुपं खासगी असल्यामुळे अधिकारी अनेकदा तासनतास एकाच कामात अडकून पडतात. याची गंभीर दखल घेत दिल्लीतील केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था कार्यालयाकडून सर्व राज्य औषध मानक नियंत्रण संस्थांच्या कार्यालयांना सुचना करुन दम देण्यात आला आहे.

प्रत्येक राज्यांमध्ये औषध मानके नियंत्रण संस्थांची कार्यालये आहेत. आपल्या राज्याचे औषध मानके आणि नियंत्रण संस्था कार्यालय मुंबई सेंट्रल येथे आहे. कार्यालयातील छोटे मोठे अधिकारी आणि कर्मचारी मंत्रालयात स्वत:च्या कामासाठी फेऱ्या मारत असतात. ही कामे कोणत्याही प्रकारची असून यातून कार्यालयातील कामे मात्र प्रलंबित राहत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

- Advertisement -

कुटुंब आणि आरोग्य कल्याण मंत्रालयाकडून अशी सुचना औषध मानके नियंत्रण संस्था कार्यालयाला जारी केली आहे. औषध मानक नियंत्रण संस्थांच्या कार्यालयातील पदाधिकारी आणि कर्मचारी कामासाठी मंत्रालयात खेटे घालत असतात. जो पर्यंत मंत्रालयातून बोलवणे येत नाही तो पर्यंत मंत्रालयात कामासाठी येऊ नये. तसेच ही कामे वैयक्तिक स्वरुपाची असल्यास मंत्रालयात अजिबात जाऊ नये, अशी सुचना पत्रातून करण्यात आली आहे. आपल्या काही वैयक्तिक कामासाठी जसे की, बदली करुन घेणे, मागण्यांचा पाठपुरवठा करण्यासाठी, खाजगीतील मॅन्युफॅक्चरच्या सोयींसाठी ही मंडळी मंत्रालयात दाखल होतात.

हेही वाचा –

भाजपची चार जणांची तिसरी यादी जाहीर; पण ‘त्या’ चार ज्येष्ठांना पुन्हा डावलले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -