घरमनोरंजनअभिनयाबरोबर स्मिताचा 'या' कार्यात सक्रीय सहभाग!

अभिनयाबरोबर स्मिताचा ‘या’ कार्यात सक्रीय सहभाग!

Subscribe

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री स्मिता तांबे नेहमीच वेगळं काहीतरी करण्याच्या प्रयत्न करते. आपल्या अभिनय क्षेत्राबरोबरच सामाजिक भानही ती जपते. गणपती उत्सवादरम्यान घरी मातीचा गणपती बनवला आणि पर्यावरण पूरक उत्सव साजरा केला. मात्र उत्सवानंतरही ती सामाजिक भान विसरली नाही. नुकताच तीने ‘कोस्टल बीच क्लिनिंग’मध्ये सक्रिय सहभाग घेतला.


सण-वार आले की आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो. पण आपल्या घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठीही आपले हात पूढे सरसावण्याची गरज आहे. ब-याचदा गणपती विसर्जनानंतर अनेकजण समुद्रकिनारा स्वच्छ ठेवण्यासाठी सरसावतात. पण मुंबईच्या समुद्रकिना-यावर असलेलं प्लॅस्टिकचं साम्राज्य पाहता, समुद्रकिनारा अधुमधून स्वच्छ होण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. यासाठी स्मिता तांबेने पुढाकार घेतला आहे.

- Advertisement -

“मी मढला राहते. आणि मढ बीचला मॉर्निंग वॉकला येताना इथे असलेलं प्लॅस्टिकचं साम्राज्य आणि अस्वच्छ होत चाललेला समुद्रकिनारा याने धड चालताही येत नसल्याची जाणीव होत होती. जरी पालिकेचे कर्मचारी तो कचरा उचलण्यासाठी येत असले, तरीही हा कचरा इतक्या महिन्यांचा किंवा वर्षाचा आहे, की ह्याला जास्त हातांची गरज आहे, हे लक्षात आलं. आणि मग बीच क्लिनिंगमध्ये मी सहभाग घेतला.”
– स्मिता तांबे, अभिनेत्री

- Advertisement -

सध्या स्मिता इडियट्स या नाटकात काम करत आहे. या नाटकाचे नुकतेच १०० प्रयोग पुर्ण झाले. १०० व्या प्रयोगाला जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी हजेरी लावली. ७२ मैल एक प्रवास या चित्रपटातून स्मिता प्रेक्षकांच्या घराघरात पोहचली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -