घरमुंबईपर्यटकांसाठी वाईट बातमी! ओपन डेक बसमधून यापुढे 'मुंबई दर्शन' करता येणार नाही

पर्यटकांसाठी वाईट बातमी! ओपन डेक बसमधून यापुढे ‘मुंबई दर्शन’ करता येणार नाही

Subscribe

मुंबई : गेल्या अनेक वर्षापासून मुंबई दर्शन करण्यासाठी आलेल्या पर्यटकांना डबल डेकर ओपन डेक बसने फिरविले जाते. पण आता हीच डबल डेकर बस 5 ऑक्टोबर महिन्यापासून हद्दपार होणार आहे. यामुळे मुंबई दर्शनासाठी आलेल्या पर्यटकांना ओपन डेक बसमध्ये बसण्याचा आनंद घेता येणार नाही. यामुळे मुंबई दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांना मोठा धक्का मानला जातो.

सध्या तीन ओपन डेक बस पर्यटकाना मुंबईचे दर्शन घडवित आहे. कारण या तिन्ही ओपन डेक बसचे आयुर्मान संपले असून या बस जुन्या झाल्यामुळे त्या हद्दपार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण ओपन डेक बस खरेदी करण्यासाठी काढण्यात आलेली निविदा ही रद्द केल्याची बेस्टने सांगिले आहे. याचा अर्थ मुंबई दर्शना कोणतीही सोय अद्याप तर केलेली नसल्याचे स्पष्ट होत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – सावधान…अतीव्यायामही बेतू शकतो जीवावर; 27 वर्षीय बॉडीबिल्डरचा हृदयविकाराने मृत्यू

ओपन डेक बस अशी केली सुरू 

मुंबई दर्शनासाठी आलेल्या पर्यटकांना फिरण्यासाठी ओपन डेक बस वापरल्या जातात. या बसमधून पर्यटकांना मुंबईतील पर्यटन स्थळे सहज पाहाता येत होती. मुंबईत 26 जानेवारी 1997 पासून एमटीडीसीच्या मदतीने ही ओपन डेक बस सेवा सुरू करण्यात आली होती. या ओपन डेक बस मधून जवळपास 20 हजार पर्यटक मुंबई दर्शन करत असल्याची माहिती मिळाली आहे. पण आता हीच ओपन डेक बस ऑक्टोबरला बंद करण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाकडून करण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – “वेळ लागला तरी चालेल, पण आरक्षण टिकले पाहिजे”, मराठा आरक्षणावर शिंदे गटाची भूमिका

बसमधून ‘ही’ ठिकाणे पाहू शकता

ओपन डेक बस ही मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना मंत्रालय, विधानभवन, सीएसएमटी, बीएमसी, हुतात्मा चौक, हॉर्निमल सर्कल, आरबीआय, प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम, एशियाटिक लायब्ररी, जुने कस्टम हाऊस, एनसीपीए, मरीन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी, चर्चगेट स्थानक, ओव्हल मैदान, मुंबई हायकोर्ट आणि मुंबई विद्यापीठ या ठिकाणांची सफर घडवण्यात येत होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -