घरक्राइमफ्लाइट अटेंडंटचा विनयभंग करणारा बांगलादेशी तरुण जेरबंद; मस्कत-ढाका विमानातील प्रकार

फ्लाइट अटेंडंटचा विनयभंग करणारा बांगलादेशी तरुण जेरबंद; मस्कत-ढाका विमानातील प्रकार

Subscribe

मुंबई : मस्कत-ढाका विमानात फ्लाइट अटेंडंटचा विनयभंग केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी 30 वर्षीय बांगलादेशी तरुणाला अटक केली आहे. गुरुवारी विस्तारा विमान काही वेळासाठी मुंबई विमानतळावर उतरले असताना ही घटना घडली.

हेही वाचा – ट्रेनी एअर होस्टेसची हत्या करणाऱ्याची लॉकअपमध्येच आत्महत्या; पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह

- Advertisement -

आरोपीचे नाव मोहम्मद दुलाल असे असून तो मूळचा बांगलादेशचा नागरिक आहे. तो मस्कतहून मुंबईमार्गे बांगलादेशला जाणाऱ्या विमानातून प्रवास करत होता. विमान मुंबईत उतरण्याच्या अर्धा तास आधी तो आपल्या सीटवरून उठला आणि त्याने फ्लाइट अटेंडंटला मिठी मारली आणि तिला किस करण्याचा प्रयत्न केला. इतर केबिन क्रूने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता आरोपी दुलाल त्यांच्यावर भडकला. फ्लाइट कॅप्टननेही त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. शेवटी फ्लाइट कॅप्टनने आरोपीला ‘अनियंत्रित प्रवासी’ म्हणून घोषित केले.

मुंबई विमानतळावर संबंधित विमान उतरल्यानंतर आरोपी दुलाल याला सुरक्षा दलांसमोर हजर करण्यात आले. तेथून त्याला सहार पोलीस ठाण्यात नेण्यात आले. फ्लाइट अटेंडंटने दिलेल्या तक्रारीनंतर आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. यानंतर त्याला स्थानिक न्यायालयात हजर केले असता, त्याची शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली.

- Advertisement -

हेही वाचा – हा हुकमी एक्का तुमच्या हाती…, शिवसेनेच्या ‘निष्ठा दहीहंडी’ उत्सवात झळकला बॅनर

‘विस्तारा’बाबत याआधी तक्रार
दिल्लीहून कोलकात्याला आलेल्या विस्तारा विमानात घडलेली एक धक्कादायक घटना अलीकडेच समोर आली होती. दिल्लीला विमानात बसलेल्या एका अंध महिलेला कोलकाता येथे पोहोचल्यानंतर आधी थांबण्यास सांगण्यात आले आणि नंतर बराच वेळ विमानात तिला एकटीलाच बसवून ठेवले. या महिलेचा मुलगा आयुष केजरीवालने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता.

खूप वेळाने विमानाची साफाई करण्यासाठी कर्मचारी आले, तेव्हा त्यांना आई आत वाट पाहात असल्याचे आढळले. यानंतर त्यांनी आईला विमानातून खाली उतरवले. आई दृष्टिहीन असल्याने तिच्या प्रवासासाठी ‘सहाय्यक यात्रा योजना’ घेतली होती. मात्र तरीही तिला प्रवासात कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही, असे आयुषने म्हटले होते. त्यानंतर विस्तारा एअरलाइन्सने या संपूर्ण प्रकाराबाबत खेद व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -