आपण घराबाहेर जेव्हा झाडे लावतो तेव्हा आपल्या सर्वात पहिला प्रश्न पडतो तो म्हणजे झाड कशात लावावे. झाडे लावताना बहुतेक वेळा आपल्या कडून चुका या होत असतात. अशावेळी कोणते झाड कशात लावावे हे आपल्याला बहुतेक वेळा समजत नाही. अशातच सगळेजण प्लास्टिक आणि मातीच्या कुंड्याच वापरतात. तसेच कोणत्या कुंडीत झाडे चांगली वाढतील या बद्दल आपल्याला पुरेशी माहिती नसते. अशातच आपण कोणतीही झाडे कशातही लावतो आणि मग आपली झाडे खराब होतात. जाणून घेऊया आपल्या नेहमीच्या झाडांसाठी कोणती कुंडी बरोबर आहे.
- आजकाल सगळेजण बहुतेक प्लास्टिकचीच भांडी वापरतात.
- कारण ती हलकी आणि वजनाने जड नसतात.
- तसेच प्लास्टिकची भांडी दिसायला देखील छान वाटतात.
- पण प्लास्टिकच्या भांडयात छोट्या वनस्पती चांगल्या वाढतात. कारण त्यांना पाण्याची जास्त गरज नसते.
- अशाच जर का तुम्हाला मोठे झाड लावायचे असेल किंवा उपयोगी वनस्पती लावायच्या असतील तर यासाठी मातीच्याकुंड्या खूप फायदेशीर आहेत.
- जर आपण मातीच्या भांड्याबद्दल विचार केला तर मातीचे भांडे थोडे थंड असते.
- तसेच मातीच्या भांड्यात वनस्पती लवकर वाढतात.
- मातीच्या भांड्यात पाणायचे बाष्पीभवन होते हे तुम्ही पाहिले असेल,पण प्लास्टिकच्या भांड्यात असं होत नाही.
- प्लास्टिकच्या कुंड्या उन्हाळामुळे गरम होतात आणि यामुळे झाडांची वाढ खुंटते.
- झाडांना चांगल्या बाष्पीभवनची नेहमी गरज असते.
- त्यामुळे हे बाष्पीभवन प्लॅस्टिकच्या कुंडीत आपल्याला झालेले दिसत नाही.
- तर याउलट मातीच्या कुंडीत चांगले बाष्पीभवन होते ज्यामुळे झाडांचे आयुष्य वाढते.
- महत्वाचे म्हणजे झाडे लवकर मरत नाहीत. तसेच त्यांना लवकर कीड देखील लागत नाही.
- Advertisement -
________________________________________________________________________
हेही वाचा : घरच्या घरी ‘असा’ लावा फ्लॉवर
- Advertisement -