Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र हा हुकमी एक्का तुमच्या हाती..., शिवसेनेच्या 'निष्ठा दहीहंडी' उत्सवात झळकला बॅनर

हा हुकमी एक्का तुमच्या हाती…, शिवसेनेच्या ‘निष्ठा दहीहंडी’ उत्सवात झळकला बॅनर

Subscribe

मुंबई : मुंबई-ठाण्यासह राज्यभरात गुरुवारी दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या उत्सावाला राजकीय शक्तीप्रदर्शनाची किनारही होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ‘निष्ठा दहीहंडी’ उत्सवात झळकलेला एक बॅनर याचीच प्रचिती देत होता.

- Advertisement -

मुंबई, ठाणे आणि त्यासोबतच आसपासच्या उपनगरांमध्ये गुरुवारी सकाळपासूनच दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळाला. मुंबई आणि ठाण्यातील अनेक शहरांमध्ये मोठमोठ्यांचे हंडींचे आयोजन करण्यात आले होते. आगामी निवडणुका लक्षात ठेवत राजकारण्यांकडून लाखो रुपयांच्या दहीहंड्या आयोजित करण्यात आलेल्या होत्या. या दहीहंड्या फोडण्यासाठी सर्वच गोविंदा पथकांनी गर्दी केलेली पाहायला मिळाली. काही ठिकाणी चार-पाच तर काही ठिकाणी नऊ थरापर्यंतची सलामी देणाऱ्या गोविंदा पथकांवर राजकीय आयोजकांनी बक्षिसांची लयलूट केली. यावर्षी अनेक दहीहंडी कार्यक्रमांमध्ये सेलिब्रिटींचा देखील मोठा सहभाग होता. यंदाही शंभराहून अधिक गोविंदा जखमी झाले.

हेही वाचा – मुख्यमंत्री शिंदेंसह फडणवीस-अजित पवार पंचतारांकित शेतकरी, ठाकरे गटाचा हल्लाबोल

- Advertisement -

एकीकडे विविध गोविंद पथकांचा जल्लोष सुरू असताना दुसरीकडे राजकीय शक्तीप्रदर्शनही सुरू होते. घाटकोपर येथे आमदार राम कदम तर, ठाण्यातील मानाची हंडी आणि दिघे साहेबांची दहीहंडी म्हणून ओळख असलेल्या हंडीचे आयोजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आले होते. मनसे नेते अविनाश जाधव यांनी आयोजित केलेल्या दहीहंडीच्या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित राहत गोविंदांचे स्वागत केले.

हेही वाचा – गोविंदा आला रे आला म्हणत… ठाकरे गटाकडून हर्षोल्हासात दहीहंडी उत्सव साजरा

दादरमध्ये शिवसेना भवनजवळ युवासेनेकडून निष्ठा दहीहंडीचे ही आयोजन करण्यात आले होते. या दहीहंडीमध्ये शिवसैनिकांच्या ‘निष्ठे’चेही दर्शन झाले. ‘साहेब तुमचे सर्व बादशाह गेले तरी, शिवसैनिक हा हुकमी एक्का तुमच्या हाती आहे, तोच सर्वांचा खेळ संपवणार,’ असा बॅनर खार पूर्व येथील अष्टविनायक फ्रेंड्स ग्रुपने झळकावला होता. युवासेनेचे पुण्यातील उपजिल्हाप्रमुख ओमकार तुपे पाटील यांनी, ‘आजच्या निष्ठा दहीहंडी उत्सवास एका गोविंद पथकाने आणलेला हा संदेश हीच आपल्या उद्धव ठाकरे यांनी कमावलेली खरी संपत्ती,’ असे कॅप्शन देत हा फोटो ट्वीट केला आहे.

- Advertisment -