घरमुंबईबेस्टची टिकटिक पुन्हा सुरू; ट्रायमॅक्स मशीन बंद असल्याने तोट्यात वाढ

बेस्टची टिकटिक पुन्हा सुरू; ट्रायमॅक्स मशीन बंद असल्याने तोट्यात वाढ

Subscribe

तिकीट पंचची ही टिकटिक बेस्ट बसची एक ओळख बनून राहिली होती. मात्र ट्रायमॅक्स मशिन आल्या आणि ही टिकटिक बंद झाली. ती पुन्हा ऐकायला मिळणार नाही अशी शंका असताना ट्रायमॅक्स मशिनची दुरुस्ती बंद झाली. त्यामुळे या मशिन गायब झाल्या असून बसमध्ये पुन्हा जुन्या तिकीटी आणि तिच टिकटिक ऐकू येऊ लागली आहे.

बेस्टच्या बसमध्ये बसलं की टिकटिक करत कंडक्टर तिकीट मागायला यायचा. तिकीट पंचची ही टिकटिक बेस्ट बसची एक ओळख बनून राहिली होती. मात्र ट्रायमॅक्स मशिन आल्या आणि ही टिकटिक बंद झाली. ती पुन्हा ऐकायला मिळणार नाही अशी शंका असताना ट्रायमॅक्स मशिनची दुरुस्ती बंद झाली. त्यामुळे या मशिन गायब झाल्या असून बसमध्ये पुन्हा जुन्या तिकीटी आणि तिच टिकटिक ऐकू येऊ लागली आहे.

मुंबईची ओळख असलेली बेस्ट गेल्या काही वर्षात आर्थिक तोट्यात आहे. बेस्ट उपक्रम २१०० कोटी रुपयांच्या तोट्यात आहे. बेस्टवर सध्या १८९० कोटी रुपयांचे कर्ज आहे. अशा आर्थिक परिस्थितीत बेस्टला फक्त तिकिटाच्या माध्यमातून उत्पन्न मिळते. २०१० पासून बेस्ट बसमध्ये तिकीट वितरणाचे काम ट्रायमॅक्स मशीनद्वारे केले जाते. या मशिनचे कंत्राट २०१६ पर्यंत होते. हे कंत्राट नंतर २०१७ पर्यंत वाढवण्यात आले. या कालावधीत मशीन खराब झाल्या. मशीन चार्ज होत नसल्याच्या, मशीनबाबत कंपनीकडून योग्यप्रकारे सेवा मिळत नसल्याच्या तक्रारी कर्मचार्‍यांकडून येत होत्या. यामुळे या मशीन उपक्रमातून हद्दपार कराव्यात, अशी मागणी कर्मचारी आणि बेस्ट समिती सदस्यांकडून केली जात होती. त्यानंतरही नादुरुस्त व चार्ज न होणार्‍या मशीन कर्मचार्‍यांच्या माथी मारल्या जात होत्या.

- Advertisement -

गेली आठ वर्षे सुरु असलेल्या ट्रायमॅक्स मशीनचे कंत्राट बुधवारी (११ जुलैला) संपुष्ठात आले. ट्रायमॅक्स कंपनी मशीन दुरुस्त करणार नसल्याने या मशीन वापरणे बंद करण्यात आले आहे. मॅकेनिक आणि रिपेरिंगचे कंत्राट संपणार असल्याने तिकीट वाटपाच्या मशीन आठवडाभर आधीच काढून घेण्यात आल्या. लहान अंतराच्या मार्गावर कागदी तिकीट वाटप करण्यास वरिष्ठ अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले आहे. लांबच्या अंतराच्या मार्गावर काही मशीन वापरल्या जात असल्या तरी त्याही काही तासात बंद पडतात. मशीन बंद पडल्यावर आम्हाला कागदी तिकीट द्यावी लागतात असे वाहकांकडून सांगण्यात आले.

फुकटे प्रवासी वाढले

मशीन असताना तिकीट विक्रीचा हिशोब द्यायला आम्हाला १५ मिनिटे लागायची. आता कागदी तिकिटाचा हिशोब द्यायला एक ते दिड तास लागत आहेत. यामुळे ड्युटी संपल्यावर आम्हाला घरी जाण्यास उशीर होतो. तिकीट वितरण करताना वेळ लागत असल्याने अनेक प्रवासी तिकीट न घेताच प्रवास करतात. मशीन नसल्याने पास काढून प्रवास करणार्‍या प्रवाशांचे पास तपासले जात नाहीत. याचा फायदा अनेक फुकटे प्रवासी उचलत असून पास असल्याचे सांगून मोफत प्रवास करत असल्याने बेस्टचे लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याने बेस्ट बसवाहकांनी सांगितले.

- Advertisement -

काय आहे ट्रायमॅक्स 

बेस्ट उपक्रमात ४ कोटी रुपये खर्च करून तिकिटांची छपाई केली जायची. कागदी तिकीट बंद करून त्याऐवजी मशीनद्वारे तिकीट वितरण करता यावे म्हणून २५ कोटी रुपये खर्च करून २०१० मध्ये ट्रायमॅक्स मशीन खरेदीचे कंत्राट देण्यात आले. हे कंत्राट २०१६ पर्यंत आणि नंतर २०१७ पर्यंत वाढवण्यात आले. मुदत संपल्यानंतरही २०१८ या मशीन वापरल्या जात आहेत.

ट्रायमॅक्स मशीनच्या दुरुस्तीचे कंत्राट संपले आहे. यामुळे बेस्टचा महसूल बुडत आहे. याला सर्वस्वी बेस्टचे महाव्यवस्थापक जबाबदार आहे.
– रवी राजा, बेस्ट समिती सदस्य व विरोधी पक्ष नेते, महापालिका

महाव्यवस्थापकांना आम्ही वारंवार सांगत होतो या मशीन खराब झाल्या आहेत. त्याऐवजी आपण दुसर्‍या मशीन घेण्याचे कंत्राट देऊ या. त्याचा पायलट प्रोजेक्ट पूर्ण झालेला आहे. असे असताना महाव्यवस्थापकांनी मशीन घ्यायला नकार दिला. तीन वर्षानंतर जी नवीन सिस्टम येणार आहे त्या मशीन आताच घ्यायच्या या हट्टापायी त्यांनी पायलट प्रोजेक्ट्च्या मशीनला नकार दिला. त्यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे. याला सर्वस्वी महाव्यवस्थापक आणि त्यांना पाठीशी घालणारे आयुक्त जबाबदार आहेत.
-सुनील गणाचार्य, बेस्ट समिती सदस्य


अजेयकुमार जाधव । मुंबई

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -