घरमनोरंजन'सेक्रेड गेम्स'च्या दृष्यांवर सोमवारी होणार हायकोर्टात सुनावणी

‘सेक्रेड गेम्स’च्या दृष्यांवर सोमवारी होणार हायकोर्टात सुनावणी

Subscribe

'सेक्रेड गेम्स'मधील काही दृष्यं हटवण्याची मागणी सध्या जोर धरू लागली आहे. यासंदर्भात दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली असून १६ जुलैला याची सुनावणी देण्यात येणार आहे.

सध्या भारतामध्ये वेबसिरीज प्रेक्षकांना जास्त आवडायला लागल्या आहेत. ‘नेटफ्लिक्स’वर नुकतीच सुरु झालेली ‘सेक्रेड गेम्स’ ही प्रेक्षकांचं लक्ष सध्या वेधून घेत आहे. विक्रम चंद्रा यांच्या ‘सेक्रेड गेम्स’ या पुस्तकावर आधारीत ही वेब सीरिज आहे. वेबसिरीज असूनही याला एका चित्रपटाचा फील आहे. याची कथा तर चांगली आहेच. मात्र यातील काही दृष्यं हटवण्याची मागणी सध्या जोर धरू लागली आहे. यासंदर्भात दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली असून १६ जुलैला याची सुनावणी देण्यात येणार आहे.

काय आहे याचिकेत?

‘सेक्रेड गेम्स’ वेबसिरीजमध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा अपमान करणारी काही दृष्यं आणि संवाद असल्याचा याचिकेमध्ये दावा करण्यात आला आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती चंद्रशेखर यांच्या खंडपीठासमोर याचिका दाखल केल्यानंतर सीडी बघून सोमवारी यावर निर्णय घेण्यात येईल असा निर्णय देण्यात आला आहे. यापूर्वी कार्यवाहक मुख्य न्यायाधीश गीता मित्तल आणि न्यायमूर्ती सी. हरी शंकर यांनी कोणतंही कारण न सांगता सुनावणी देण्यास नकार दिला होता. तर वकील शशांक गर्गनं दाखल केलेल्या याचिकेमध्ये याचिकाकर्ता निखिल भल्लानं सैफ अली खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या या वेबसिरीजमध्ये बोफोर्स मुद्दा, शाहबानो खटला, बाबरी मस्जिद प्रकरण आणि दंगल यासारख्या देशातील घटनांना चुकीच्या पद्धतीनं दाखवण्यात आल्याचं नमूद केलं आहे. तर, नेटफ्लिक्स एन्टरटेनमेंट, निर्माता फँटम फिल्म्स प्रॉडक्शन लिमिटेडनं केंद्रीय माजी पंतप्रधान आणि त्यांच्या परिवाराविरोधात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष तऱ्हेनं दाखवण्यात आलेली दृष्यं आणि अपमानजनक टिप्पणी काढून टाकण्याची मागणी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -