घरमुंबईबेस्टचा अर्थसंकल्प मंजूर न करता परत पाठवण्याचा निर्णय

बेस्टचा अर्थसंकल्प मंजूर न करता परत पाठवण्याचा निर्णय

Subscribe

बेस्ट उपक्रमाला पालिकेने आतापर्यंत अडीच हजार कोटी रुपयांचे अनुदान दिल्यानंतरही त्याचा हिशोब बेस्टकडून नीटपणे देण्यात येत नसल्याचे सांगितले. यावर समिती अध्यक्ष व सदस्यांनी त्यावर तीव्र नाराजी व्यक्त करीत बेस्टचा अर्थसंकल्प सुधारित करून परत आणण्यात सांगितले आहे.

बेस्ट उपक्रमाचा सन २०२१-२२ साठी बेस्ट उपक्रमाने सादर केले होता. त्यासाठी १८८७.८३ कोटी तुटीचा अर्थसंकल्प (जो बेस्ट समितीने सुधारित करून १.४४ लाख रुपये शिलकीचा म्हणून कागदावर दाखवत मंजूर केला.) स्थायी समितीने साधक बाधक चर्चेअंती मंजूर न करता पालिका सभागृहामार्फत बेस्ट प्रशासनाकडे परत पाठविण्याचा निर्णय आज स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

सदर अर्थसंकल्पावर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे व भालचंद्र शिरसाठ यांनी भाषण करताना बेस्ट उपक्रमात गेल्या अनेक वर्षापासून येत असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या तोट्यावर बोट ठेवत असमाधान व्यक्त केले होते. तसेच, बेस्ट उपक्रमाला पालिकेने आतापर्यंत अडीच हजार कोटी रुपयांचे अनुदान दिल्यानंतरही त्याचा हिशोब बेस्टकडून नीटपणे देण्यात येत नसल्याचे सांगितले. यावर समिती अध्यक्ष व सदस्यांनी त्यावर तीव्र नाराजी व्यक्त करीत बेस्टचा अर्थसंकल्प सुधारित करून परत आणण्यात सांगितले आहे. यासाठी सदर अर्थसंकल्प पालिका सभागृहामार्फत बेस्टला परत पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

यावेळी, बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र कुमार बागडे यांनी, बेस्टची बाजू मांडण्याचा कसोशीने प्रयत्न केला मात्र त्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणावर असमाधान व्यक्त करीत वरीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे. बेस्ट उपक्रमाच्या सन २०२१- २२ च्या अर्थसंकल्पात, एकूण उत्पन्न ४,९३९.३० कोटी रुपये तर खर्च ६,८२७.१३ कोटी रुपये दाखवले असून बेस्टला उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असल्याने १८८७.८३ कोटी रुपये इतकी तूट दाखविण्यात आली आहे. मात्र बेस्ट समितीमध्ये, आकडेवारी कागदावर बदलत हा अर्थसंकल्प १.४४ लाख रुपये शिलकीचा दाखवत मंजूर करण्यात आला होता. तशी माहिती बेस्ट समिती अध्यक्ष प्रवीण शिंदे यांनी दिली होती.

स्थायी समितीच्या बैठकीत या अर्थसंकल्पावर केवळ तीन सदस्यांनी चर्चा करून अर्थसंकल्प सुधारित करून मांडण्याची मागणी करीत अर्थसंकल्प परत बेस्टकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालिका सभागृहनेत्या विशाखा राऊत यांच्या अनुपस्थितीत बेस्टवरील चर्चेअंती समिती सदस्य विश्वनाथ महाडेश्वर यांनी, उपसूचना मांडत सदर अर्थसंकल्प बेस्टकडे परत पाठविण्याची मागणी केली असता अध्यक्षांनी त्यास सहमती दर्शवली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबई मेट्रो कारशेडवरून सत्ताधारी-विरोधक भिडले!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -