घरताज्या घडामोडीशेतकऱ्यांच्या समर्थनार्थ शिख गुरुंची आत्महत्या

शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ शिख गुरुंची आत्महत्या

Subscribe

बुधवारी संत बाबा राम सिंह यांनी स्वतःला गोळी मारून आत्महत्या केली.

दिल्ली-हरयाणा बॉर्डर (सिंघु बॉर्डर)वरील शेतकरी आंदोलनात सामील असलेले संत बाबा राम सिंह यांनी बुधवारी स्वतःला गोळी मारून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर त्यांना जखमी अवस्थेमध्ये एका जवळच्या रुग्णालयात दाखल केले गेले होते, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. बाबा राम सिंह हे कर्नाळचे राहणारे आहेत. त्यांनी लिहिलेली सुसाईड नोट समोर आली आहे. या नोटमध्ये त्यांनी शेतकरी आंदोलनाचा उल्लेख केला असून शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवला आहे.

या बाबांचा सेवादार गुरमीत सिंह यांनी या घटनेची माहितीला दुजोरा दिला. त्यांनी सांगितले की, ‘बाबा जी फक्त हरयाणा आणि पंजाबचे नाही, तर जगभरातील कोट्यावधीचे अनुयायी आहेत.’

- Advertisement -

सुसाईड नोटमध्ये काय लिहिले आहे?

आपल्या हक्क्यासाठी शेतकऱ्यांनी दुःख पाहिले आहे. रस्त्यावर त्यांना पाहून मला खूप दुःख झाले आहे. सरकार त्यांना न्याय देत नाही आहे. हे अन्यायकारक आहे, जो अन्याय करतो तो पापी आहे. अन्याय सहन करणे देखील पाप आहे. काही शेतकऱ्यांच्या हक्कासाठी तर काहींनी अन्यायाला विरोध केला आहे. कोणीतरी पुरस्कार परत करून आपला राग व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, सरकारी अन्यायाच्या रागाच्या भरात सेवादार आत्महत्या करत आहे. हा अन्यायाविरोधात आवाज आहे. हा शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आवाज आहे. वाहे गुरु जी का खालसा, वाहे गुरुजी की फतेह.

- Advertisement -

हेही वाचा – शेतकरी आंदोलन अधिक तीव्र; अन्नदात्यांचं आज ‘उपोषण’


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -