घरमुंबईभिवंडीकरांनी थकवली 52 कोटींची पाणीपट्टी

भिवंडीकरांनी थकवली 52 कोटींची पाणीपट्टी

Subscribe

भिवंडी शहर महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांनी पाणीपट्टी कर न भरल्याने थकबाकीचा मोठा डोंगर उभा राहिला आहे. पालिकेची सुमारे 52 कोटीची थकबाकी वसूल करण्यास पालिका प्रशासन असमर्थ ठरल्याने चालू आर्थिक वर्षात फक्त 8 कोटींचीच वसूली झाली आहे. असे असताना पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्यावतीने जलवाहिन्या, बोरवेल पाईपलाईन आणि जलशुद्दीकरण केंद्राची निगा व दुरुस्ती करण्याच्या नावाखाली 4 कोटी 52 लाख 45 हजार रुपये खर्च करण्याचा घाट घातला आहे.

या खर्चाच्या मंजुरीसाठी महासभेपुढे पाणीपुरवठा विभागाच्यावतीने प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे भाजप नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शहर महापालिकेच्या कार्यक्षेत्रात 1 ते 5 प्रभाग समिती निहाय पाणीपुरवठ्याचे दैनंदिन कामकाज चालते. या कार्यक्षेत्रात राहणार्‍या नागरिकांकडून पाणीपट्टीची थकीत कराची रक्कम सक्तीने वसूल करण्याचे आदेश पाणीपुरवठा अभियंता आणि प्रभाग अधिकारी आणि उपायुक्त आदींना पालिका आयुक्त मनोहर हिरे यांनी दिले आहेत. असे असताना पाणीपुरवठा अधिकारी, कर्मचार्‍यांकडून वसुलीच्या कामाकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे थकबाकीचा डोंगर दिवसेंदिवस वाढतच आहे.

- Advertisement -

कोणी किती थकवले?
पालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक 1 मध्ये 16 कोटी 74 लाख , प्रभाग 2 – 11 कोटी 1 लाख, प्रभाग 3 – 12 कोटी 70 लाख, प्रभाग 4 – 6 कोटी 20 लाख, प्रभाग 5 – 5 कोटी 63 लाख अशी एकूण 52 कोटी रुपयांची पाणीपट्टी कराची थकबाकी असताना चालू वर्षी फक्त 8 कोटी 23 लाख पाणीपट्टी वसूली झाल्याची बाब समोर आली आहे. पाणीपुरवठा विभागात मोठ्या प्रमाणात तोटा होत असताना या विभागाने 1 ते 5 प्रभाग समिती कार्यक्षेत्रात असलेल्या जलवाहिन्या, पाईप लाईन, बोरवेल आणि वर्‍हाळा तलाव जलशुद्धी केंद्र निगा व दुरुस्तीसाठी 4 कोटी 52 लाख 75 हजार 293 रुपये खर्चाच्या मंजुरीसाठी महासभेत पाणीपुरवठा विभागाच्यावतीने प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे भाजप नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -