घरमुंबईदहा हजार विद्यार्थ्याना योगचे प्रशिक्षण

दहा हजार विद्यार्थ्याना योगचे प्रशिक्षण

Subscribe

मुंबई विद्यापीठात ‘योग सदभावना’ कार्यक्रम

शारीरिक, भावनिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक ऊर्जा यामुळे सर्वांगिण विकास होत असून योग हे त्यासाठीचे महत्त्वाचे साधन आहे. योगवर लक्ष केंद्रीत केल्यास सर्वांगिण विकास होत असल्याने आयुष मंत्रालयाच्या कॉमन योग प्रोटोकॉलच्या नियमनानुसार मुंबई विद्यापीठातर्फे दहा हजार विद्यार्थ्यांना योगाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच यातून योग शिक्षकही घडवण्यात येणार आहेत.

मुंबई विद्यापीठातर्फे भविष्यात 10 हजार विद्यार्थ्यांना योगचे प्रशिक्षण देऊन त्यांना प्रशिक्षित केले जाणार आहे. आतापर्यंत विद्यापीठाकडून सात हजार विद्यार्थ्यांना योगचे प्रशिक्षण दिले आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने हे प्रशिक्षण देण्यात येत आहे. योग प्रशिक्षणासाठी कॉमन योगा प्रोटोकॉल सहा ते आठ तास थेअरी सत्र आणि विशिष्ट मूल्यांकनाद्वारे प्रशिक्षण दिले जात आहे. थेअरी सत्रांमध्ये योगचा इतिहास, योगच्या विविध शाखा, योगचे समग्र स्वरूप आणि व्यक्ती आणि समाजाच्या कल्याणासाठी योगदान करण्याची क्षमता याचा समावेश केला आहे. शिक्षण आणि मूल्यमापन प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करणार्‍या प्रशिक्षणार्थींना योग इंटरनॅशनल प्रमाणपत्र दिले. प्रशिक्षणार्थीने अन्य बॅचला यशस्वीरित्या प्रशिक्षण दिल्यावर त्यांना मास्टर इंटरनॅशनल प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे समन्वयक प्रा. बाबासाहेब बिडवे यांनी सांगितले.

- Advertisement -

योग सदभावना कार्यक्रमाचे आयोजन
मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना, हैदराबाद सिंध नॅशनल कॉलेजिएट बोर्ड आणि कैवल्यधाम यांच्यातर्फे मरीन लाईन्स येथील स्पोर्टस पवेलियन येथे ‘योग सदभावना’ कार्यक्रम झाला. यावेळी नॅशनल कौन्सिल फॉर टिचर एज्युकेशनच्या अध्यक्षा डॉ. सतबीर बेदी, हैदराबाद सिंध नॅशनल कॉलेजिएट बोर्डचे माजी विश्वस्त किशू मनसुखानी, सचिव डॉ. दिनेश पंजवानी आणि कैवल्यधामचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी उपस्थित होते.

योगमुळे सर्वांगिण विकास साध्य करता येऊ शकल्याने अधिकाधिक विद्यार्थ्यांनी योग प्रात्याक्षिक करण्यासाठी प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी योगासाठी अधिकाधिक लोकांना प्रेरित करावे.
– प्रो. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -