घरमुंबईरस्त्यावरील खड्ड्यांमुळे २३ दिवसांच्या बाळाचे पितृछत्र हिरावले

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे २३ दिवसांच्या बाळाचे पितृछत्र हिरावले

Subscribe

राज्यभरातल्या खड्ड्यांची दूरवस्था झाल्याचे आपल्याला पहायला मिळते. त्यामध्ये प्रामुख्याने मुंबई, ठाणे, कल्याण आणि भिवंडी येथील रस्ते शिल्लक राहिले नसून तेथे खड्ड्यांचे साम्राज्य पहायला मिळत आहे. कल्याणमधील रस्त्यांवरील खड्यांमुळे आतापर्यंत अनेक लोकांना जीव गमवावा लागला आहे. आता अशीच एक घटना भिवंडीमध्ये घडली आहे. भिवंडी येथील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे एक अपघात झाला असून या अपघातामध्ये एका २३ दिवसांच्या चिमुरड्या बाळाने त्याचे वडील गमावले आहेत. भिवंडी येथील भिवंडी-वाडा रस्त्यावरील खड्ड्याने ३० वर्षीय युवकाचा जीव घेतला आहे. गणेश शांताराम पाटील असे या तरुणाचे नाव असून अपघातात तो जबर जखमी झाला होता. त्याला स्थानिकांनी जवळच्या रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारादरम्यान गणेशचा मृत्यू झाला. या अपघातात नवजात बालकाने त्याच्या डोक्यावरील पितृछत्र हिरावले आहेत.

कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

सुप्रीम कन्स्ट्रक्शन या कंत्राटदार कंपनीने भिवंडी-वाडा हा रस्ता बांधला होता. निकृष्ट दर्जाचा रस्ता बांधल्यामुळे गणेश पाटीलला त्याचा जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे या कंपनीवरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी वाडा येथील स्थानिक नागरिकांनी केला आहे. अपघातानंतर वाडा येथील ग्रामस्थांनी गणेशचा मृतदेह घेऊन सदर रस्त्यावर रास्ता रोको केला होता. त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

- Advertisement -

भिवंडीतील खड्ड्यांमुळे अनेकांनी गमावलेत जीव

भिवंडी-वाडा या रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे. य खड्ड्यांमुळे आतापर्यंत खड्ड्यांमुळे अनेक जनांना जीव गमवावा लागला आहे. गणेश पाटील दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी भिवंडीहून त्याच्या घरी जात होता. पालखने गावाजवळ असलेल्या खड्ड्यांमुळे गणेशची दुचाकी घसरली व खूप दूरपर्यंत फरफटत जाऊन दुभाजकावर जाऊन आदळली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर गणेशवर ठाण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र काल सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे त्याची अवघ्या २३ दिवसांची मुलगी पोरकी झाली आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -