घरलाईफस्टाईलमधुमेहाबद्दल या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का

मधुमेहाबद्दल या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का

Subscribe

व्यक्तीच्या रक्तातील साखरेची पातळी जेवढी उच्च तेवढा तिला हृदयविकाराचा धोकाही जास्त होतो. मधुमेह नसलेल्यांच्या तुलनेत रुग्णाला हृदयविकाराचा धोका अधिक असतो.

मधुमेह हा हृदयविकाराच्या दृष्टीने एक अत्यंत गंभीर असा धोकादायक घटक आहे. मधुमेहींमधील हृदयविकाराचा धोका वाढवणारे आणखी घटक म्हणजे कोलेस्टरॉलची उच्च पातळी, उच्च रक्तदाब, धूम्रपान, अतिरिक्त वजन, स्थूलपणा, शारीरिक हालचालींचा अभाव, आहाराच्या अनारोग्यकारी सवयी, कमी वयात हृदयविकार होण्याची आनुवांशिकता, ताण वगैरे. इन्सुलिन प्रतिरोधाचा विकार किंवा या धोक्यांपैकी दोन-तीन एकाच वेळी अस्तित्वात असणे यामुळे हृदयविकाराचा किंवा पक्षाघाताचा धोका आणखी वाढतो. डायबेटिस मेलिटस हा विकारांचा एक समूह असून, शरीराच्या इन्सुलिन तयार करण्याच्या किंवा ते वापरण्याच्या क्षमतेत निर्माण झालेल्या बिघाडांमुळे वाढलेली रक्तातील ग्लुकोजची पातळी हे त्याचे लक्षण आहे. व्यक्तीच्या रक्तातील साखरेची पातळी जेवढी उच्च तेवढा तिला हृदयविकाराचा धोकाही जास्त. मधुमेह नसलेल्यांच्या तुलनेत रुग्णाला हृदयविकाराचा धोका अधिक असतो, हृदयविकाराच्या दृष्टीने धोकादायक घटक त्यांच्यात अधिक प्रमाणात आढळतात, त्यांना तरुण वयात हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो, त्यांना होणारा हृदयविकाराचा त्रास अदिक तीव्र स्वरूपाचा असू शकतो.

लोकांना वाटते की हृदयविकाराचा धक्का बसेल तेव्हा त्यांच्या लक्षात येईल. त्यांची अपेक्षा असते की छातीत तीव्र वेदना होतील किंवा त्या वेदना डाव्या हातापर्यंत जातील. मात्र, प्रत्येक हृदयविकाराच्या झटक्याच्या वेळी ही “ठरलेली” लक्षणे दिसतीच असे नाही. हृदयविकाराच्या झटक्यांपैकी सुमारे १५-२० टक्के “सायलेंट” समजले जातात. हृदयविकाराचा हा मूक झटका कोणत्याही स्पष्ट लक्षणांशिवाय येतो, किंवा काही वेळा कोणत्याही लक्षणांशिवायही येतो. यामुळे हृदयविकाराचा झटका आलेला लक्षातच येत नाही, तो येऊन गेल्यानंतर काही दिवसांनी, काही महिन्यांनी किंवा काही वर्षांनीही लक्षात येतो. हृदयविकाराच्या मूक झटक्यांचे प्रमाण स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये अधिक असते; मात्र, असे मूक झटके प्राणघातक ठरण्याचे प्रमाण स्त्रियांमध्ये अधिक आहे.- गाडगे डायबिटीस सेंटर, डायबेटोलॉजिस्ट डॉ. प्रदीप गाडगे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -