घरमुंबईVIDEO : मी रामाला मानत नाही, राम कोणी देव नाही; जीतनराम मांझी...

VIDEO : मी रामाला मानत नाही, राम कोणी देव नाही; जीतनराम मांझी यांचे वादग्रस्त विधान 

Subscribe

बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी हे वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. जमुई जिल्ह्यातील सिकंदरा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमाला मांझी यांनी लोकांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी भगवान रामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. राम कोणी देव नाही म्हणत त्यांनी रामायण लिहिणाऱ्या वाल्मिकी आणि तुलसीदासांवर माझा विश्वास आहे. पण रामाला मी ओळख नाही अस वादग्रस्त विधान केले. ते इथवरच थांबले नाहीत. पुढे ते म्हणाले की, भगवान राम अस्तित्वात थोडी होते, ते तुलसीदास आणि वाल्मिकी यांच्या रामायणातील एक पात्र होते. त्यांची पूजा पाठ करण्यासाठी ते कोणी मोठे नव्हते. अनुसूचित जातीच्या लोकांनी पूजा पाठ करणे बंद करावे.

ब्राह्मणांवर निशाणा साधत मांझी म्हणाले की, जे ब्राह्मण मांस खातात आणि दारू पितात ते खोटे बोलतात. अशा ब्राह्मणांपासून दूर राहावे, त्यांच्याकडून पूजा पाठ करू घेऊ नये. तुम्ही लोक देखील पूजा करणे बंद करावे, यावरच ते पुढे म्हणाले की, रामाने शबरीची खोटी बेरी खाल्ली होती.

- Advertisement -

सिकंदरा येथील हिंदुस्तान आवाम पक्षाचे आमदार प्रफुल्ल मांझी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र या कार्यक्रमात त्यांनी भगवान राम आणि ब्राह्मणांविरोधात केलेल्या विधानामुळे आता मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आधीच देशात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अजान विरुद्ध हनुमान चालीसा या विधानावरून वाद सुरु आहे, अशात आमदार मांझी यांनी केलेले विधान नव्या वादाला तोंड फोडणार असल्याची शक्यता आहे.से

तसेच मांझी अजून पुढे म्हणाले की, सवर्ण आणि उच्चवर्णीय हे भारतातील मूळ रहिवासी नसून बाहेरचे आहेत. दरम्यान मांझी हे स्वत:ला माता साबरी यांचे वशंज असल्याचे सांगतात, पण त्याचवेळी ते रामाला देव मानत नाहीत.

- Advertisement -

मांझी यांची वादग्रस्त विधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील ते अशा अनेक वक्तव्यामुळे चर्चेत आले होते. हिंदुस्तान आवाम मोर्चाचे सुप्रीमो असलेले मांझी सतत भगवान राम, हिंदू धर्म आणि ब्राह्मणांविरोधात वक्तव्य करत असतात. मांझी हे बिहार राजकारणातील महादलित समाजातील सर्वात मोठा चेहरा मानला जातात. गेल्या डिसेंबरमध्ये ब्राह्मणांवर केलेल्या वक्तव्यामुळे मांझी चांगलेच अडचणीत सापडले होते. धर्मांवर वादग्रस्त करणारे मांझी राहुल गांधी, तेजस्वी यादव आणि चिराग पासवान यांच्याविरोधात देखील सतत आपत्तीजनक विधान करत असतात.


 

 

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -