घरताज्या घडामोडीमहापालिकेने ग्लोबल टेंडर काढून मुंबईकरांचे मोफत लसीकरण करावे, भाजपची मागणी

महापालिकेने ग्लोबल टेंडर काढून मुंबईकरांचे मोफत लसीकरण करावे, भाजपची मागणी

Subscribe

मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना स्पष्ट शब्दात बजावले

मुंबईतील भाजप नगरसेवकांच्या वॉर्डात लसीकरण केंद्र सुरु केले नाही. महापालिकेचा पक्षपातीपणा खपवून घेणार नाही असा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्ब्ला सिंह चहल यांना दिला आहे. मुंबई महापालिकेने ग्लोबल टेंडक काढून लस खरेदी करावी तसेच मुंबईकरांना मोफत लसीकरण करावे अशी मागणी दरेकरांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. तसेच मुंबईतील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यात यावे असे आश्वासनही पालिका आयुक्तांनी दिले असल्याचे प्रवीण दरेकरांनी सांगितले आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या भेटीनंतर पत्रकार परिषदेच प्रवीण दरेकर बोलत होते.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे की, मुंबईकरांच्या विषयावर महानगरपालिका आयुक्तांची भेट मागितली होती. परंतु आयुक्त भेट नाकारात होते. मुंबईकरांसाठी मोफत लस मिळाली पाहिजे. १८ ते ४४ वयोगटासाठी लागणारे लसीचे डोस खरेदी करण्यासाठी एकरक्कमी चेक तयार आहे. मोफत लस द्यायची जबाबदारी आमची असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. उपलब्ध लसीतून लसीकरण वेळेत होणार नाही. केंद्रातून ४५ वर्षांसाठी येणारी लस दुसऱ्या डोससाठी वापरण्यात यावी, मुंबई महापालिकेने स्वतंत्र ग्लोबल टेंडर काडून स्वतःच्या पैशाना लस घ्यावी अशी मागणी आज भाजपच्या शिष्टमंडळाने केली असल्याचे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

यावर अशा प्रकराचे ग्लोबल टेंडर मुंबई महापालिकेककडून काढले जाईल आणि मुंबईतील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यात येईल असे आश्वासन आयुक्तांनी दिले असल्याचे दरेकरांनी सांगितले आहे. कारण एका बाजूला मोफत लसीकरण बोलतो आणि दुसऱ्या बाजुला केंद्र सरकारकडे बोट दाखवत केंद्र सरकारने सांगितले आहे की, खासगी रुग्णालयात पैसे देऊन लसीकरण करता येईल. मग सरसकाट १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण कसे काय होणार. की सगळे लसीकरण खासगी रुग्णालयात पैशाने करुन घेण्याची राज्य सरकार वाट पाहणार आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारचे तसेच कुठल्याही प्रकारची संभ्रमवस्था मुंबईकरांच्या मनात नको आणि त्याची स्पष्टता महानगरपालिका आयुक्तांकडून करुन घेतलेली आहे. आणि त्याच्यामुळे ग्लोबल टेंडर काढून मुंबईकरांना मोफत लसीकरण करावे केंद्रीची लस ज्या त्या घटकासाठी वापरण्यात यावी अशी आमची मागणी आहे.

मुंबई महापालिका पक्षपातीपणा करत आहे.

मुंबई पालिका पक्षपातीपणा करत आहे. याबाबत आयुक्तांच्या लक्षात आणून दिले आहे. अतुल भातखळकर आमदार आहेत त्यांच्या वॉर्डमध्ये भाजपचे नगरसेवक आहेत त्यांच्या वॉर्डात लसीकरण केंद्र नाहीत. आशिष शेलार यांच्या वॉर्डात ६ पैकी ३ नगरसेवक आहेत त्यांच्या ३ वॉर्डमध्ये लसीकरण केंद्र नाही शिवसेनेचे नगरसेवक असलेल्या वॉर्डात लसीकरण केंद्र, काँग्रेसच्या वॉर्डात लसीकरण केंद्र आहे. यामुळे मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना स्पष्ट शब्दात बजावले आहे की, अशा प्रकारचे प्रशासकीय अधिकारी म्हणून तुम्हाला पक्षपातीपणाने वागता येणार नाही. यामुळे आयुक्तांनी सांगितले आहे की, शुक्रवार पर्यंत २२७ लसीकरण केंद्र आम्ही चालु करु, परंतु आयुक्त कशाच्या भरोशावर बोलत आहेत ते माहित नाही. लसीकरण केंद्र सुरु करुन लस उपलब्ध होणार आहे का? याचे उत्तर आयुक्त देऊ शकले नाहीत.

- Advertisement -

पारदर्शकपणे लसीकरण केंद्र आसावीत, किती लस उपलब्ध आहे, किती लोक तिथे येऊ शकतात अशा सर्व प्रकारची माहिती डॅशबोर्डवर असावी अशी मागणी केली आहे. तसेच येत्या २ दिवसांत आढावा घेत स्ट्रिमलाईन करु असे मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेने अतिशय पारदर्शकपणे कोरोना लसीकरण राबवावे आणि मुंबईकरांना मोफत लसीकरण करावे अशी मागणी भाजपकडून करण्यात आली असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -