घरमुंबईसुजय विखे-पाटील अडचणीत; भाजपमध्ये घेण्यास पदाधिकाऱ्यांचा विरोध

सुजय विखे-पाटील अडचणीत; भाजपमध्ये घेण्यास पदाधिकाऱ्यांचा विरोध

Subscribe

सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाला अहमदनगरमधील भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी विरोध केला आहे. दरम्यान, उद्या सुजय विखे-पाटील भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांना भाजपमधून जोरदार विरोध होत आहे. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या अडचणीत वाढ झाली आहे. सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाला अहमदनगरमधील भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी विरोध केला आहे. त्यांनी मुंबईंध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर जोरदार घोषणाबाजी करत रोष व्यक्त केला.

सुजय विखे पाटील यांना विरोध

आज मुंबईतील भाजप कार्यालयात राज्यातील महत्वाच्या नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी राज्यभरातील भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील देखील भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या बैठकीसाठी आले आहेत. त्यांनी सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाला कडाडून विरोध केला. त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोरच सुजय विखे पाटील यांच्या प्रवेशावरुन रोष व्यक्त केला. त्यांनी भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांनाच पुन्हा उमेदवारी द्यावी अशी मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली.

- Advertisement -

उद्या करणार भाजपमध्ये प्रवेश

सुजय विखे -पाटील उद्या भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुजय विखे पाटील हे अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची जागा लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र ही जागा राष्ट्रवादीकडे असून राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस करता ही जागा सोडण्यास तयार नाही. त्यामुळे अहमदनगरमधील आघाडीच्या जागेचा तिढा अद्याप सुटत नसल्याने सुजय विखे पाटील चांगलेच अस्वस्थ झाले आहेत. सुजय विखे पाटील यांनी भाजपाचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांची भेट देखील घेतली होती. सुजय विखेंचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित झाल्याने आघाडीला अहमदनगरमध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -