घरमहाराष्ट्रतर सुजय विखे पाटील जाणार भाजपामध्ये?

तर सुजय विखे पाटील जाणार भाजपामध्ये?

Subscribe

अहमदनगरमधील आघाडीच्या जागेचा तिढा अद्याप सुटत नसल्याने विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील भाजपामध्ये जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील हे अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची जागा लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र ही जागा राष्ट्रवादीकडे असून राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसलाकरता ही जागा सोडण्यास तयार नाही. त्यामुळे अहमदनगरमधील आघाडीच्या जागेचा तिढा अद्याप सुटत नसल्याने विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव चांगलेच अस्वस्थ झाले आहेत. जर येत्या दोन दिवसात निर्णय झाला नाही तर सुजय विखे पाटील मोठा निर्णय घेणार असल्याची माहिती ‘आपलं महानगर’ला विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना सांगीतले होते की, सुजय आपले निर्णय घेण्यास मोकळे आहेत. तसेच सुजय विखे पाटील यांनी भाजपाचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांची भेट देखील घेतली होती.

तासभर रंगली चर्चा

वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या शिवनेरी या शासकीय निवासस्थानी झालेल्या या बैठकीत दोघांची तासभर चर्चा झाली. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून सुजय विखे पाटील इच्छुक आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस जागा सोडत नसल्याने सुजय नाराज आहेत. तसेच सुजय यांना नगरमधून रिंगणात उतरायचे असल्यास त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसने दिला होता. मात्र सुजय यांना राष्ट्रवादीत घेऊन तिकीट देण्याऐवजी काँग्रेसला नगरची जागा सोडावी असा काँग्रेसचा आग्रह होता.

- Advertisement -

राहुल गांधी घालणार लक्ष

दरम्यान या सगळ्यामध्ये काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी स्वतः लक्ष घालणार असून, उद्या दिल्लीमध्ये बैठक आयोजित केली असून, या बैठकीत औरंगाबाद आणि अहमदनगर या दोन जागांवर चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.


वाचा – सुजय विखे पाटील राष्ट्रवादीतून नगरची जागा लढवणार?

- Advertisement -

वाचा – राज्य सीमेवरील सैनिकांच्या पाठिशी – राधाकृष्ण विखे पाटील


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -