घरमुंबईमनसेच्या 'संतापा'च्या स्वाक्षरीला भाजपाकडून 'भविष्यासाठी' स्वाक्षरीतून उत्तर

मनसेच्या ‘संतापा’च्या स्वाक्षरीला भाजपाकडून ‘भविष्यासाठी’ स्वाक्षरीतून उत्तर

Subscribe

सत्तानाट्यानंतर मनसे आणि भाजपमध्ये बिनसले

मुंबई ः मागील काही वर्षापासून राज्यात सुरु असलेल्या राजकीय उलथापालथीवर मनसेकंडून काही दिवसांपासून एक सही संतापाची ही मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेत राज्यभरातील नागरिक स्वाक्षरी करुन आपला संताप व्यक्त करीत असल्याचे चित्र आहे. अशातच रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कमध्ये जाऊन या आंदोलनात सहभागी होत आढावा घेतला. मात्र, आता या मनसेच्या संतापाच्या स्वाक्षरी मोहिमेला भाजपकडून उत्तर मिळाले आहे. भाजपने आता एक सही भविष्यासाठी ही मोहीम सुरु केली आहे.

2 जुलै रोजी अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. या राजकीय उलथापालथीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करीत आपला संताप व्यक्त केला होता. तर राज्यातील जनता हे कसे काय सहन करते असाही सवाल यावेळी राज्यातील जनतेला विचारला होता. त्यानंतर या सगळ्या पार्श्वभूमीवर मनसेच्या वतीने राज्यातील राजकीय उलाढालीवर एक सही संतापाची ही मोहीम सुरु केली होती. या मोहीमेला राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे. मात्र, दरम्यानच मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी एक सही भविष्यासाठी ही मोहीम भाजपकडून सुरु केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा ः ज्यांच्यावर अविश्वास असेल त्यांना खुर्चीवर बसण्याचा नैतिक अधिकार नाही-दानवे

यावेळी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी मनसे, उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार तरुणांच्या भविष्यासाठी काम करत असल्याचा उल्लेख करीत आम्हाला याचा अभिमान आहे, म्हणून एक सही भविष्यासाठी या अभियानांतर्गंत शहरातील सर्व महाविद्यालयामध्ये ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

- Advertisement -

मोहीमेतून कोणालाही उत्तर नाही
पुढे बोलताना आशिष शेलार म्हणाले की, या मोहीमेतून कोणाच्याही मोहीमेला उत्तर नसून, आम्ही विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी ही मोहीम राबवत आहोत. तर संताप मनसेला मत न मिळण्याचा आहे असाही टोला त्यांनी यावेळी मनसेला लगावला.

देशात 39 टक्क्याने विद्यापीठांची संख्या वाढवली.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पहिल्यांदाच आयआयएम सुरू होत असून 350 एमबीए विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे. आता मुंबईतील तसेच महाराष्ट्रातील तरुणांना राज्याबाहेर जाण्याची गरज नाही. वर्षानुवर्षाची ही मागणी पूर्ण होते आहे. त्याबरोबर आर्थिक मागास घटकातील विद्यार्थ्यांना आरक्षणाच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांची सोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. त्यांनी वैद्यकीय पदवीधर जागा वाढवल्या. मेडिकलच्या पदव्युत्तर जागांमध्ये वाढ केली. देशात ३९ टक्क्याने विद्यापीठांची संख्या वाढवली. अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -