घरCORONA UPDATEठाण्यात रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार; पाच जणांना अटक

ठाण्यात रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार; पाच जणांना अटक

Subscribe

कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार मुंबईसह ठाण्यात मोठ्या प्रमाणात सुरु आहे. मुंबई, मीरारोडनंतर ठाण्यातदेखील या औषधाचा काळाबाजार करणाऱ्या पाच दलालांना ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. रेमेडिसिवीर या इंजेक्शनचा काळाबाजार करणारी या दलालाची साखळी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईसारख्या शहरात कार्यरत असून या दलालाचे थेट संबंध शहरातील बड्या रुग्णालयाशी असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

- Advertisement -

अरुण रामजी सिंग (वय ३५), सुधाकर गिरी (वय ३७), रवींद्र शिंदे (वय ३५), वसीम शेख (वय ३२) आणि अमिताभ निर्मल दास (वय ३९) असे अटक करण्यात आलेल्या दलालांची नावे आहेत. मुंबई, नवी मुंबईत या ठिकाणी राहणारे हे दलाल मंगळवारी दुपारी ठाण्यातील नौपाडा तीन पेट्रोल पंप या ठिकाणी कोरोना रुग्णांवर वापरल्या जाणाऱ्या रेमडेसीवीर इंजेक्शनची काळ्या बाजारात चढ्या भावाने विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे कोथमिरे यांनी अन्न व औषध प्रशासन अधिकारी यांच्यासोबत या ठिकाणी छापा टाकून पाचही जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळून २ रेमेडीसीवर इंजेक्शन आणि कर्करोगावरील एक ‘टॉसिलीझूमब’ इंजेक्शन हस्तगत केले. या दोन्ही इंजेक्शचा बाजारात तुटवडा असून त्याची २५ ते ८० हजार रुपयांना विक्री करण्यात येणार होती, अशी माहिती चौकशी समोर आली आहे.

- Advertisement -

ताब्यात घेणात आलेल्या पाचही जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोथमिरे यांनी दिली.

हेही वाचा –

पुणे महापालिकेचे सहाय्यक आरोग्य प्रमुख पॉझिटिव्ह; १२ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -