घरCORONA UPDATECorona Live Update: औरंगाबादमध्ये कोरोनाचा उद्रेक

Corona Live Update: औरंगाबादमध्ये कोरोनाचा उद्रेक

Subscribe

Pune Corona Update: दिवसभरात १,७५१ नवे रूग्ण; ८८३ जणांना डिस्चार्ज

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून गेल्या २४ तासांत तब्बल १० हजार ५७६ नव्या रूग्णांची नोंद राज्यात करण्यात आली आहे. तर दिवसभरात २८० जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. तसेच मुंबईपाठोपाठ पुण्यात देखील कोरोनाचा कहर सुरूच आहे. आज दिवसभरात ८३३ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण २५ हजार १२९ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. तर दिवसभरात ३३ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण १ हजार ६८ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर सध्या पुणे शहरात १६ हजार २६९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. (सविस्तर वाचा)

- Advertisement -

औरंगाबादमध्ये कोरोनाचा उद्रेक

औरंगाबादमध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत दिसत असून आजची आकडेवारी ही धडकी भरणारी आहे. आज औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ४२८ रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोना टेस्ट लॅबमध्ये ८४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. तर अँटीजेन चाचणीमध्ये ४४ जण बाधित आढळले आहेत. तर खासगी प्रयोगशाळेत केलेल्या आहवालात पॉझिटिव्ह आढळून आलेल्या आणि आयसीएमआर पोर्टलवर नोंद झालेल्या ३०० रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली आहे. यामुळे उपचार सुरु असलेल्या एकूण रुग्णांची संख्या आता १ हजार २८१ इतकी झाली आहे. तर आतापर्यंत १ हजार २९१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या २ हजार ६२० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

- Advertisement -

पुण्याचे रस्ते,चौक सील


मुंबईत आज १ हजार ३१० नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आल्याने कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ४ हजार ५७२ वर पोहचली आहे. तर ५८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ५ हजार ८७२ वर पोहचला आहे.


राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून गेल्या २४ तासांत तब्बल १० हजार ५७६ नव्या रूग्णांची नोंद राज्यात करण्यात आली आहे. तर दिवसभरात २८० जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण ३ लाख ३७ हजार ६०७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच आज दिवसभरात ५ हजार ५५२ कोरोना रूग्णांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण १ लाख ८७ हजार ७६९ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५५.६२ % एवढे झाले आहे. (सविस्तर वाचा)


मणिपूरमध्ये उद्यापासून लॉकडाऊन जाहिर करण्यात आला आहे.


उल्हासनगरातील होमक्वारंटाईन रुग्णांसाठी बेंगळूरूचे समुपदेशक पथक सज्ज

पालिका आयुक्त डॉ.राजा दयानिधी यांच्या निर्देशान्वये आपापल्या निवासस्थानी होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या कोविड रुग्णांचे बळ-मनोधैर्य-मानसिकता सक्षम करण्याच्या उद्देशाने बेंगळूरू मधील योसेड या प्रसिद्ध एनजीओ संस्थेचे दूरध्वनी समुपदेशक पथक सज्ज करण्यात आले आहे. जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांनी ही माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

कोविड रुग्णालयात बेड्सची संख्या कमी असून त्याअनुषंगाने कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना होम क्वारंटाईन करण्यात येत आहे. अशा रुग्णांत जनजागृती करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी योसेड ही संस्था विनामूल्य कार्य करणार आहे. तसेच अत्यावश्यक असलेल्या रुग्णांना मदत करणार आहे. कोविडग्रस्तांचे मानसिक बळ, मनोधैर्य, मानसिकता सक्षम करण्याचा यामागे उद्देश आहे. योसेड संस्थेला यापूर्वी भिवंडीमध्ये काम करण्याचा अनुभव असून त्यात त्यांना यश आले आहे. त्याअनुषंगाने संस्थेचे दूरध्वनी समुपदेशक पथक तयार करण्यात आले आहे. होम क्वारंटाईन असलेल्या नागरिकांशी ही संस्था दूरध्वनीद्वारे सातत्याने संपर्क साधणार आहे व अत्यावश्यक असलेल्यांना विनामूल्य मदत करणार आहे. पालिका आयुक्त डॉ.राजा दयानिधी यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड रुग्ण संसर्गजन्य आजारातून तात्काळ बरा होण्यासाठी ही योजना फलदायी ठरणार असा विश्वास जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांनी प्रसिद्धी पत्रकात व्यक्त केला आहे. सदर माहिती ही कोरोनाने बाधित, सौम्य लक्षणे असल्याने घरीच क्वारंटाईन करण्यात आलेल्यांना देण्यात यावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसत आहे. साताऱ्यात एका रात्रीत ८६ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे साताऱ्यातील कोरोनाबाधितांचा आकडा २ हाजर ६४३वर पोहोचला असून आतापर्यंत ९० जणांचा मृत्यू झाला आहे.


गेल्या २४ तासांत पुणे जिल्ह्यात २०५ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ५६ हजार ६२१वर पोहोचला आहे. तसेच यापैकी आतापर्यंत १ हजार ४४२ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पुणे जिल्हा आरोग्य अधिकारी भगवाग पवार यांनी दिली.


औरंगाबाद जिल्ह्यात आज ९९ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ११ हजार ७६५वर पोहोचला असून आतापर्यंत यापैकी ४०८ जणांचा मृत्यू झाला आहे.


देशात गेल्या २४ तासांत ३७ हजार ७२४ कोरोनाबाधित नवे रुग्ण आढळले असून ६४८ कोरोनाबाधित मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ११ लाख ९२ हजार ९१५वर पोहोचला असून मृतांचा आकडा २८ हजार ७३२ झाला आहे. सविस्तर वाचा 


बी़ड जिल्ह्यातून पाठवण्यात आलेल्या स्वॅबपैकी आज ४४ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये बीड तालुक्यातील २३, परळी ५, अंबाजोगाई १, गेवराई ८, केज ३, पाटोदा १, माजलगाव १, शिरुर तालुका २ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४२४वर पोहोचला आहे.


उत्तर अमेरिकेतील मेक्सिको या देशात कोरोना थैमान घालत आहे. मेक्सिको देशात कोरोनामुळे ४० हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती एफपी या न्यूज एजेंसीने दिली आहे. आतापर्यंत मेक्सिकोमध्ये ३ लाख ६२ हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ४० हजार रुग्णांचा मृत्यू झाला असून २ लाख २७ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


मंगळवारी २४ तासांत ८ हजार ३६९ नव्या रुग्णांची नोंद राज्यात करण्यात आली आहे. तर मंगळवारी दिवसभरात २४६ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण ३ लाख २७ हजार ३१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच मंगळवारी दिवसभरात ७ हजार १८८ कोरोना रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण १ लाख ८२ हजार २१७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५५.७२ % एवढे झाले आहे. सविस्तर वाचा 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -