घरमुंबईमुंबईकरांनो सावधान! थर्टी फस्टला ड्रिंक करून गाडी चालवणार आहात?

मुंबईकरांनो सावधान! थर्टी फस्टला ड्रिंक करून गाडी चालवणार आहात?

Subscribe

३ हजार ट्रॅफिक कर्मचारी यंदा ३१ डिसेंबरच्या रात्री मुंबईच्या रस्त्यांवर तैनात

३१ डिसेंबरला नववर्षाचे स्वागत करताना अनेक तरुण मोठ्या प्रमाणात व्यसन करतान तर अनेकजण पहिल्यांदा व्यसन करतात. मात्र यंदा नव वर्षांचं स्वागत करताना घरा बाहेर पडत असाल आणि ड्रिंक करून गाडी चालवणार असाल तर मुंबईकरांनो जरा जपून…कारण ड्रिंक करून तुम्ही गाडी चालवत असाल तर तुमच्या गाडीत तुमच्यासोबत असणाऱ्यावर देखील गुन्हा दाखल केला जाणार आहे.

दरवर्षी ड्रिंक अँड ड्राईव्हमध्ये ब्रीथ अॅनालायझरने मद्यपान केलं आहे की नाही याची चाचणी केली जात होती. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ब्लड टेस्ट करून चालकाने मद्यपान सेवन केलं आलं आहे की नाही याची तपासणी करण्यात येणार आहे. यासह जर कुणी मद्यपानाचे सेवन केलं असेल तर त्यांच्यावर मोटर व्हेईकल ऍक्ट नुसार कारवाई करण्यात येणार आहे. तसेच गाडीत असणाऱ्या सहप्रवाशांविरुद्ध सुद्धा पेंडमिक ऍक्ट नुसार कारवाई केली जाईल.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, यंदा ३१ डिसेंबरच्या रात्री ड्रिंक अँड ड्राइव्ह मोहीम यशस्वीपणे राबवण्यासाठी ट्रॅफिक विभागाकडून ९४ टीम बनवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये मुंबई पोलिस कर्मचाऱ्यांचाही समावेश असणार आहे. जर पोलिसांना एखाद्यावर मद्यपान करून गाडी चालवण्याचा संशय आला तर त्याची ब्लड टेस्ट केली जाईल आणि जर त्यामध्ये मद्यपान केल्याचं आढळलं तर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

दरम्यान, ३ हजार ट्रॅफिक कर्मचारी यंदा ३१ डिसेंबरच्या रात्री मुंबईच्या रस्त्यांवर असतील आणि वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यास सज्ज असणार असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

नववर्ष धुंदीत नव्हे, शुद्धीत साजरे करा; प्राण्यांचा मानवाला संदेश

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -