घरदेश-विदेशकोरोनाचा नवा स्ट्रेन भारतासाठी किती धोकादायक? जाणून घ्या

कोरोनाचा नवा स्ट्रेन भारतासाठी किती धोकादायक? जाणून घ्या

Subscribe

कोरोनाचा नवा स्ट्रेन अतिशय संसर्गजन्य असून वेगाने पसरतो, असं सांगत एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले

ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या कोरोनाच्या स्ट्रेनने भारतात प्रवेश केल्यानंतर एकच खळबळ उडाली. देशात साधारण २४ जणांना नव्या स्ट्रेनची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर हा नवा स्ट्रेन अधिक धोकादायक असून ७० टक्क्यांहून अधिक संसर्गजन्य असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे केंद्र सरकारच्या चिंतेत भर पडली आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळल्याने जगभरात खळबळ माजली आहे. अनेक देशांनी ब्रिटनमधूने येणाऱ्या हवाई वाहतुकीवर बंदी घातली आहे.

“प्री-एपिडिमोलॉजिकल डेटा मधून समोर आले आहे की, कोरोनाव्हायरसने अनेक ठिकाणी आपलं स्वरुप बदललं आहे. ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनबाबत सर्वाधिक चिंतेची बाब म्हणजे तो अतिशय संसर्गजन्स असून वेगाने पसरतो.”, असे एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनबाबत सांगितलं आहे.

- Advertisement -

रणदीप गुलेरिया यांनी असेही सांगितले की, “ब्रिटनमध्ये सापडलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन भारतात नोव्हेंबर किंवा डिसेंबरच्या सुरुवातीलाच आला असण्याची शक्यता आहे. पण भारतात मागील काही आठवड्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत फारशी वाढ झालेली नाही. कोरोनाचा नवा स्ट्रेन भारतातील रुग्ण आणि आरोग्य यंत्रणांवर परिणाम करु शकतो. त्यामुळे आपल्याला जास्त खबरदारी घेणं गरजेचं आहे, जेणेकरुन याच्या प्रादुर्भावाला आळा बसेल,”

- Advertisement -

भारताकडून हवाई वाहतुकीवर बंदी

ब्रिटनमध्ये कोरोनाव्हायरसचा नवा स्ट्रेन सापडल्यानंतर भारत सरकारने तातडीने पावलं उचलत २३ डिसेंबरपासून ३१ डिसेंबरपर्यंत यूकेवरुन येणाऱ्या हवाई वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. ब्रिटनहून परतलेल्या प्रवाशांची RT-PCR चाचणी केली जात आहे. त्यानंतर त्यांच्या नमुन्यांची जीनोम सीक्वेन्सिंग तपासणी केली जात आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची माहिती मिळाल्यानंतर नॅशनल टास्क फोर्सने बैठक घेऊन तयारीचा आढावा घेतला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -