घरदेश-विदेशयेमेनचं सरकार विमानतळावर पोहचताच बॉम्बस्फोट; २० ठार, ५० हून अधिक जखमी

येमेनचं सरकार विमानतळावर पोहचताच बॉम्बस्फोट; २० ठार, ५० हून अधिक जखमी

Subscribe

येमेनमधील आदेन विमानतळावर बुधवारी मोठा बॉम्बस्फोट झाला. या बॉम्बस्फोटामध्ये २२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ५० हून अधिक जखमी झाले आहेत. येमेनचे पंतप्रधान मईन अब्दुलमलिक सईद यांच्या नव्या मंत्रिमंडळातील सदस्यांना घेऊन एक विमान आदेन विमानतळावर पोहचल्यानंतर काही क्षणांत हा स्फोट झाला. सर्व मंत्री सौदी अरेबियातून परतले होते. या स्फोटात पंतप्रधान मईन अब्दुलमलिक सईद यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व सदस्य सुखरुप आहेत.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार दोन स्फोट झाले. दरम्यान या हल्ल्याची जबाबदारी कोणी घेतलेली नाही. मात्र, माहिती, संस्कृती आणि पर्यटन मंत्री मोअम्मर अल इरायणी यांनी या हल्ल्यामागे इराण समर्थीत हूथी बंडखोरांचा (Iran-supported Huthi militia) हात असल्याचं म्हटलं आहे. स्फोटाबाबत सरकारी प्रवक्त्यांकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नसली तरी एका अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर माध्यमांना घटनेचा तपशील दिला आहे. विमानातून आलेले संपूर्ण मंत्रिमंडळ आणि इतर सरकारी प्रतिनिधी सुखरूप असल्याचं या अधिकाऱ्याने सांगितलं. घटनास्थळाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यावरून स्फोटाची तीव्रता किती जास्त होती हे स्पष्ट होत आहे. विमानतळावर काही मृतदेह छीन्नविछीन्न अवस्थेत पडल्याचे त्यात दिसत आहेत.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -