घरदेश-विदेशपाकिस्तानला माहिती पुरवली; भारतीय जवानावर आरोप

पाकिस्तानला माहिती पुरवली; भारतीय जवानावर आरोप

Subscribe

'हनी ट्रॅप'च्या जाळ्यात अडकलेल्या या जवानानं व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून पाकिस्तानला संवेदनशील माहिती पाठवल्याची  बातमी गुप्तचर विभागाला मिळाली.

भारतीय लष्कराबाबतची अतिशय संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याला गंभीर आरोप, एका भारतीय जवानावर लावण्यात आला आहे. राजस्थानच्या जसलमेरमधून नुकतीच या भारतीय जवानाला अटक करण्यात आली आहे. ‘हनी ट्रॅप‘च्या जाळ्यात अडकलेल्या या जवानानं व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून पाकिस्तानला संवेदनशील माहिती पाठवल्याची  बातमी गुप्तचर विभागाला मिळाली. त्यानंतर त्वरित या जवानाला अटक करण्यात आली. सध्या त्याला चौकशीसाठी जयपूरला नेण्यात आलं असल्याची माहिती समोर आली असून, राजस्थानचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (गुप्तचर विभाग) उमेश मिश्र यांनी त्याला दुजोरा दिला आहे. सोमवीर असं या जवानाचं नाव असून, शुक्रवारी संध्याकाळी गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला अटक केल्याची माहिती मिश्र यांनी दिली. मिश्र यांच्या सांगण्यानुसार, अटकेनंतर जयपूरमध्ये आणण्यात आलेल्या सोमवीरची सध्या त्याची पोलीस चौकशी सुरू आहे.


वाचा: शिवसेनेला पटकणारा कोणी पैदा झाला नाही – उद्धव ठाकरे

सोमवीर हा व्हॉट्स्अॅपसारख्या सोशल प्लॅटफॉर्मचा वापर करुन पाकिस्तानला खासही आणि गुप्त माहिती पाठवत होता. याविषयीची माहिती काही दिवसांपूर्वी पोलीस आणि लष्कराला मिळाली होती. त्यामुळे लष्कराच्या गुप्तचर विभागाचे अधिकारी आणि पोलिसांचं एक विशेष पथक सोमवीरवर नजर ठेवून होते. पाकिस्तानमधील एका महिलेनं सोमवीरला हनी ट्रॅपिंगच्या जाळ्यात अडकवल्याची माहिती लष्कर आणि पोलिसांनी मिळाली होती. त्याच महिलेला सोमवीर भारतीय सैन्याशी निगडीत सर्व गुप्त माहिती पुरवत होता. प्रशिक्षणादरम्यान सोमवीर आणि या महिलेची भेट झाल्याचं, त्याने पोलिसांना सांगितलं.

- Advertisement -

त्यानंतर जेव्हा सोमवीरची नियुक्ती जसलमेरमध्ये झाली त्यावेळी त्याने या महिलेला व्हॉट्सअ‍ॅपवरुन गुप्त माहिती पाठवायला सुरुवात केल्याचं, अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी सांगितलं. या सगळ्याचा सुगावा लागल्यानंतर गुप्तचर विभाग आणि पोलिसांच्या विशेष पथकाने ट्रॅप लावून सोमवीरला रंगे हात पकडलं.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -