घरमुंबईमालमत्ता कर थकवणार्‍या २६२ मालमत्तांच्या जलजोडणी तोडल्या!

मालमत्ता कर थकवणार्‍या २६२ मालमत्तांच्या जलजोडणी तोडल्या!

Subscribe

मालमत्ता कर थकवणाऱ्यांवर मुंबई महानगर पालिकेकडून कारवाई करण्यात येत आहे.

मालमत्ता कर थकबाकीपोटी मुंबईतील २६२ मालमत्तांची जल जोडणी तोडण्यात आली आहे. यामध्ये शहर भागातील ६४ मालमत्ता आणि पूर्व व पश्चिम उपनगरातील अनुक्रमे १०४ आणि ९४ मालमत्तांचा समावेश आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक जलजोडणी तोडण्याची कारवाई ही कुर्ल्यात करण्यात आली असून या भागात ५८ मालमत्तांची जलजोडणी तोडण्यात आली आहे. तर या खालोखाल मालाडमध्ये ३० आणि मुलुंडमध्ये २६ मालमत्तांचे पाणी तोडण्यात आले आहे.
मालमत्ता विषयक कर थकविणार्‍या मालमत्तांवर अटकावणी(अ‍ॅटॅच) प्रक्रिया करण्यात येत असून या अनुषंगाने जलजोडणी तोडण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

शहर भागात सर्वाधिक करावाई

महानगरपालिकेचा मालमत्ता विषयक कर थकवणार्‍या आणि वारंवार मागणी करुनही मालमत्ता विषयक विविध करांचा न भरणार्‍यांवर करनिर्धारण व संकलन खात्याद्वारे तीव्र स्वरुपाची कारवाई यापूर्वीच हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत मालमत्ता विषयक करांचा भरणा न केल्याबद्दल मार्च च्या पहिल्या आठवड्यापर्यंत २४ विभागांमध्ये ३ हजार ५६४ मालमत्तांवर अटकावणीची प्रक्रिया करण्यात आली आहे. या अंतर्गत शहर भागातील ९ प्रशासकीय विभागांमध्ये शीव-अँटॉप हिल-वडाळा आदी विभागात सर्वाधिक म्हणजेच १४७ मालमत्तांवर कारवाई करण्यात आली आहे.

- Advertisement -

…तर मालमत्तांवर जप्ती!

पूर्व उपनगरातील ६ प्रशासकीय विभागांमध्ये सर्वाधिक कारवाई ही मुलुंडमध्ये ४८१ मालमत्तांवर आणि पश्चिम उपनगरातील ९ प्रशासकीय विभागांमध्ये दहिसरमध्ये सर्वाधिक म्हणजे ३२९ मालमत्तांवर अटकावणीची कारवाई करण्यात आली आहे. अटकावणीच्या प्रक्रियेमुळे आता या मालमत्तांच्या खरेदी विक्रीवर निर्बंध असणार आहेत. यानंतरही या मालमत्तांकडे बाकी असलेल्या विविध करांचा भरणा न केल्यास या मालमत्तांवर जप्ती प्रक्रिया सुरु करण्यात येईल, अशी माहिती महापालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्याचे सहायक आयुक्त डॉ. संगीता हसनाळे यांनी दिली आहे.


हेही वाचा – मालमत्ता कर थकविणाऱ्यांच्या गाड्या, वस्तू होणार आता जप्त!

९० दिवसांच्या आत करभरणा करावा लागणार!

मुंबई महापालिका क्षेत्रातील मालमत्ता धारकांना मालमत्ता विषयक कराची देयके प्राप्त झाल्यापासून ९० दिवसांच्या आत मालमत्ता विषयक कर महापालिकेकडे जमा करणे आवश्यक आहे. जे मालमत्ता धारक ९० दिवसांच्या मुदतीत मालमत्ता विषयक कर भरत नाहीत, त्यांच्यावर टप्पेनिहाय कारवाई सुरु करण्यात येते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -