घरताज्या घडामोडीकरोना व्हायरस : करोना झालेल्या रूग्णांचा आकडा ३४ वर!

करोना व्हायरस : करोना झालेल्या रूग्णांचा आकडा ३४ वर!

Subscribe

करोनाप्रकरणी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत 'आपण अशा कोणत्याही परिस्थितीला घाबरून न जाता याला तोंड देण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे', असे मंत्र्यांना मोदींनी सांगितले आहे.

करोना व्हायरस झालेल्या रूग्णांची संख्येत आणखी वाढत होत असल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी देशभरात करोना व्हायरस झालेल्या रूग्णांत वाढ झाली असून याची संख्या आता ३४ वर गेली आहे. याप्रकरणी आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. याप्रकरणी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर ‘आपण अशा कोणत्याही परिस्थितीला घाबरून न जाता याला तोंड देण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे’, असे मंत्र्यांना त्यांनी सांगितले आहे.

तीन जणांना करोनाची लागण

करोना व्हायरस हा सध्या अनेक देशात थैमान घालत असताना करोनाची लागण झालेल्या रूग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसत आहे. याप्रकरणी भारतात रूग्णांची संख्या वाढून ३४ वर गेली आहे. ओमानमधून तमिळनाडूत दाखल झालेल्या एका व्यक्तीला करोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच इराणहून लडाखला परतलेल्या दोघांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले असल्याने आता करोना व्हायरसची लागण झालेल्या रूग्णांमध्ये वाढ झाल्याचे समजते आहे.

- Advertisement -

पंतप्रधानांनी घेतला आढावा

देशात दिवसागणिक करोना व्हायरस झालेल्या रूग्णांत वाढ होत असली तरीही शासनाकडून करोनाचा सामना करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. करोनाबाबत दिल्ली बैठक घेऊन दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आढावा घेतला. या बैठकीत केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी संपूर्ण परिस्थिती तसेच उपाययोजनांची माहिती पंतप्रधान मोदींना दिली. यावेळी करोनाच्या नमुन्यांची तपासणी करण्यासाठी देशभरात ५२ प्रयोगशाळा सुरू करण्यात आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -