घरताज्या घडामोडीBMC : सावधान! रस्त्यावर थुंकाल तर होईल कारवाई; वाचा सविस्तर

BMC : सावधान! रस्त्यावर थुंकाल तर होईल कारवाई; वाचा सविस्तर

Subscribe

मुंबईतील रस्ते आणि सार्वजनिक ठिकाण स्वच्छ ठेवण्यासाठी मुंबई महापालिकेने कंबर कसली आहे. मुंबईतील अस्वच्छतेला आळा घालण्यासाठी मुंबई महापालिकेने पुन्हा एकदा क्लीन मार्शल नेमण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी मुंबईत महापालिकेने थुंकणाऱ्यांवर आणि रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी क्लीनअप मार्शलची नेमणूक केली होती.

मुंबईतील रस्ते आणि सार्वजनिक ठिकाण स्वच्छ ठेवण्यासाठी मुंबई महापालिकेने कंबर कसली आहे. मुंबईतील अस्वच्छतेला आळा घालण्यासाठी मुंबई महापालिकेने पुन्हा एकदा क्लीन मार्शल नेमण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी मुंबईत महापालिकेने थुंकणाऱ्यांवर आणि रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी क्लीनअप मार्शलची नेमणूक केली होती. परंतु, काही काळानंतर ही कारवाई थांबवण्यात आली. परंतु आता ही कारवाई पुन्हा सुरू होत असून उघड्यावर घाण, कचरा फेकणाऱ्यांवर ‘क्लीनअप’ मार्शलची नजर असणार आहे. महापालिकेच्या वॉर्डात ‘क्लीनअप मार्शल’ची नियुक्ती केली आहे. रस्त्यावर थुंकणे, घाण फेकणे, कचरा फेकणाऱ्यांवर क्लीनअप मार्शल २०० रुपये ते एक हजारांपर्यंत दंड वसूल करणार आहेत. (bmc clean up marshals fine if spit on road in mumbai streets from 11 march)

मुंबईत सार्वजनिक ठिकाणी कचरा आणि डेब्रिज फेकण्यास मनाई असताना काही लोकांकडून या नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील रस्त्यांवर पुन्हा क्लीनअप मार्शल नेमण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान 24 वॉर्डामध्ये टप्प्याटप्प्यात 720 क्लीनअप मार्शलची नियुक्ती होणार असून शहर गलिच्छ करणाऱ्यांकडून दंड वसूल करण्यात येणार आहे. त्यानुसार, रस्त्यावर थुंकणे, कचरा फेकणारे तसेच घाण करणाऱ्यांवर आता क्लीनअप मार्शल 200 ते एक हजार रुपये दंड आकारले जाणार आहेत.

- Advertisement -

ऑनलाइन दंड वसूली

पहिले आठ ते दहा दिवस दंडात्मक कारवाईची पोचपावती दिली जाणार असून त्यानंतर दंडाची वसुली ऑनलाइन केली जाणार आहे. ॲप विकसित करण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. शिवाय, मार्शलची नियुक्ती खासगी संस्थेच्या माध्यमातून केली जाणार आहे. या दंडात्मक कारवाईतून मिळणाऱ्या उत्पन्नातील काही वाटा महापालिकेला मिळणार आहे. तसेच, जेवढा दंड आकारणा होईल, त्यातील 50 टक्के उत्पन्न पालिकेला मिळेल तर, 50 टक्के उत्पन्न संबंधित संस्थेला मिळणार आहे.

राज्यातील 2020 साली आलेल्या कोरोना महामारीच्या काळात तोंडावर मास्क न घालणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसाठी क्लीनअप मार्शल तैनात करण्यात आले असते. मात्र ‘क्लीनअप मार्शल’ बेकायदेशीर दंड वसूल करत आहे, अशा अनेक तक्रारी महापालिकेकडे आल्या होत्या. त्यानंतर त्यांचा करार रद्द करण्यात आला. मात्र आता मुंबईत सार्वजनिक ठिकाणी कचरा आणि डेब्रिज फेकण्यास मनाई असताना काही लोकांकडून या नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे. त्यामुळे म्हणून महापालिकेने क्लीनअप मार्शल नियुक्तीचा निर्णय घेतला.

- Advertisement -

हेही वाचा – Mumbai : महिला लैंगिक हिंसाचारात वाढ; पालिकेकडून ‘दिलासा’ केंद्रांचा विस्तार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -