घरमुंबईBMC : कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी SITकडून मुंबई महापालिकेत झाडाझडती

BMC : कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी SITकडून मुंबई महापालिकेत झाडाझडती

Subscribe

BMC : कोरोना महामारीच्या (Coronavirus Pandemic) कालावधीत हजारो कोटींची औषध खरेदी, रूग्णालय उभारणी आदी कामात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपातर्फे (BJP) माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी केला आहे. तसेच, मुंबई पालिकेत (BMC) कोट्यवधी रुपये अधिकचे खर्चून भूखंड खरेदी करण्यात आला असून विविध विकास कामांमध्ये अनियमितता आढळली आहे. टेंडर न काढता हजारो कोटींची विकासकामे कंत्राटदारांना देण्यात आली. त्यामुळे या सर्व प्रकरणात राज्य शासन नियुक्त विशेष तपास पथकाने (SIT) आज (17 जुलै) थेट पालिका मुख्यालयात धडक देऊन झाडाझडती घेतली. (BMC In case of multi-crore scam SIT raids Mumbai Municipal Corporation)

मुंबई पालिकेत करण्यात आलेल्या कारवाईत काही महत्वाच्या फाईल्स, कागदपत्रे ताब्यात घेतल्याचे व संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी केली असल्याचे सूत्रांकडून समजते. त्यामुळे पालिका मुख्यालयात खळबळ उडाली आहे. एसआयटी पथकाने ज्या संशयित विभागाची चौकशी केली. त्या विभागातील संबंधित अधिकाऱ्यांचे व इतर विभागातील संबंधित अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून त्यांच्या पायाखालची वाळू आता सरकू लागली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – फडणवीसांचा वाढदिवस : ‘या’ कारणाने होऊ शकते कार्यकर्त्यांवर कारवाई; भाजपाकडून नवा आदेश

एसआयटीच्या पथकाने सोमवारी महापालिकेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी थेट सीएसएमटी रेल्वे स्थानकासमोरील मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील नवीन प्रशासकीय इमारतीमधील विकास नियोजन विभागात आणि नंतर काही पालिका वार्ड कार्यालयातही धडक दिल्याचे सूत्रांकडून समजते. या पथकाने विकास नियोजन विभागात संबंधित अधिकाऱ्यांकडे काही वेळ त्यांना अपेक्षित माहिती मिळविण्यासाठी चौकशी केली. तसेच, कोट्यवधी रुपये जादा खर्चून खरेदी करण्यात आलेल्या भूखंड प्रकरणासह विविध कामांच्या फाईल्स एसआयटीच्या टीमने ताब्यात घेतल्याचे समजते.

- Advertisement -

दरम्यान, मार्च 2020 पासून कोरोना महामारी पसरल्यानंतर नियंत्रण मिळविण्यासाठी पालिकेकडून तात्पुरते रूग्णालय उभारणी, औषध खरेदी, कंत्राटी तत्वावर मनुष्यबळ, डॉक्टर, कामगार घेणे, ऑक्सिजन खरेदी, बॉडी बॅग खरेदी आदीबाबत अंदाजे पाच हजार कोटी रुपयांपर्यंत खर्च करण्यात आला होता. मात्र त्या खर्चाचा हिशोब पालिकेकडून देण्यात आला नाही. या कामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला, असा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मध्यंतरी केला होता.

हेही वाचा – चिंता वाढली! ऐन पावसाळयात टंचाईचे संकट; जिल्ह्यातील धरणात केवळ ३३ टक्के जलसाठा

बिल्डर, मालक यांना कोट्यवधी रुपयांची जादा रक्कम नाहक देऊन भुखंड खरेदी करण्यात आले आहेत. रस्ते व इतर विकासकामे आदींवर पालिकेने 12 हजार कोटी रुपये खर्च केले असून त्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यामुळे पालिका प्रशासन, तत्कालीन सत्ताधारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष राज्यात सत्तेवर आलेल्या भाजप व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रडारवर आहे. त्यामुळे सध्या कॅग, ईडी व आता एसआयटी पथक यांच्याकडून पालिकेचे संशयित अधिकारी, माजी महापौर किशोरी पेडणेकर आदींची चौकशी सुरू आहे.

हेही वाचा – रिक्षातून प्रवास करताना होत होत्या चोरया; मोठी टोळी होती या कामात कार्यरत

मुंबई महापालिकेच्या ‘या’ कामांची चौकशी

  1. कोरोना काळातील रुग्णालय उभारणी, औषधे खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचे आरोप
  2. कोरोना काळात विना निविदा कंत्राटदारांना कोट्यवधीची कामे
  3. नियमानुसार 5 कोटींवरील कामाचे थर्ड पार्टी ऑडिट न करणे
  4. 3,355.57 कोटींच्या कामांचे थर्ड पार्टी ऑडिट केले नाही
  5. विकासकामे देताना संबंधीत कंत्राटदारांची पात्रता न तपासता कामे देणे
  6. 64 कंत्राटदारांना विना निविदा, करार न करता नियमबाह्यपणे 4,756 कोटींची कामे देणे
  7. दहिसर येथील भूखंड 716 अधिक टक्क्यांनी खरेदी केला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -