घरताज्या घडामोडीMumbai Corona Update: मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत घट! २४ तासांत ७८ नव्या रुग्णांची...

Mumbai Corona Update: मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत घट! २४ तासांत ७८ नव्या रुग्णांची वाढ, तर एकही मृत्यूची नोंद नाही

Subscribe

मुंबई कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने जात आहे. मुंबईतील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. काल, गुरुवारी मुंबईत फक्त ८० नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. पण कालच्या आकडेवारीच्या तुलनेत आजच्या रुग्णसंख्येत किंचित घट झाली आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत ७८ नवे कोरोनाबाधित आढळले असून एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. तसेच १२७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईत ६०० कोरोना सक्रीय रुग्ण आहेत.

मुंबईत २४ तासांत १९ हजार ७३७ कोरोना चाचण्या झाल्या होत्या, त्यापैकी ७८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये ७२ रुग्ण हे एसिम्प्टोमॅटिक आहे. मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १० लाख ५६ हजार ८०७वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १६ हजार ६९१ जणांचा मृत्यू झाला असून १० लाख ३६ हजार ६३४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisement -

आता मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर ९८ टक्के झाला असून रुग्ण दुप्पटीचा दर ५ हजार ६४५ दिवस झाला आहे. तसेच आता मुंबईत एकही सक्रीय सीलबंद इमारत आणि एकही सक्रीय कंटेनमेंट झोन नाही. दरम्यान काल, गुरुवारी २३४ ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळले होते. मात्र आज एकही ओमिक्रॉनबाधितांची नोंद मुंबईत झाली नाही.

मुंबईतील कोरोना परिस्थिती पाहून आजपासून १०० टक्के हॉटेल्स, रेस्टॉरंट्स,चित्रपटगृह, नाट्यगृह, धार्मिक स्थळे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच खासगी आणि सरकारी कार्यालये १०० टक्के क्षमतेने सुरू करण्यासही मुभा देण्यात आली आहे.

- Advertisement -


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -