घरताज्या घडामोडीआता गल्लीबोळातील आगीवर 'फायर बाईक'द्वारे नियंत्रण, जीवित व वित्तहानी कमी होण्यास मदत...

आता गल्लीबोळातील आगीवर ‘फायर बाईक’द्वारे नियंत्रण, जीवित व वित्तहानी कमी होण्यास मदत होणार

Subscribe

मुंबईतील झोपडपट्टी, दाटीवाटीच्या लोकवस्तीतील गल्लीबोळात लागणाऱ्या छोट्या स्वरूपाच्या आगीवर आता अग्निशमन दलात नव्याने दाखल होणाऱ्या “फायर बाईक”च्या साहाय्याने लवकर नियंत्रण मिळविण्यात येणार आहे. त्यामुळे जिवीत व वित्त हानी कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. यासंदर्भातील माहिती अग्निशमन दलाचे तांत्रिक सल्लागार राजेंद्र चौधरी यांनी दिली आहे.

मुंबई अग्निशमन दलाच्या वाहन ताफ्यात प्रत्येकी १३ लाख रुपये किमतीच्या ” फायर बाईक” नव्याने दाखल होणार आहेत. या “फायर बाईक” वर दोन्ही बाजूला प्रत्येकी ३० लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्यांची व्यवस्था असणार आहे. तसेच, इनबिल्ट इंजिनमुळे घटनास्थळी असणार्‍या पाण्याच्या टाक्यांमधून पाणी खेचून घेऊन त्या पाण्याचा फवारा आगीवर मारणे शक्य होणार आहे. त्यामुळे आग लवकरात लवकर विझण्यास मदत होणार आहे. या “फायर बाईक” वरच आग विझविण्यासाठी आवश्यक पाण्याची सुविधा आहे. त्यामुळे जेथे घटनास्थळी पाण्याची व्यवस्था नीटपणे होत नसेल किंवा अगदीच पाण्याची व्यवस्था नसेल तर त्या ठिकाणी या बाईकवरील पाण्याचा उपयोग होणार आहे.

- Advertisement -

अग्निशमन दलाचे दोन जवान या बाईकवरून सहजपणे बसून घटनास्थळी तात्काळ रवाना होऊन बचावकार्य युद्धपातळीवर करू शकतात. त्याचप्रमाणे, वाहतूक कोंडीतून वाट काढीत तातडीने आगीच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी सदर बाईकवर सायरनची सुविधा असून वायरलेस संपर्क यंत्रणा आणि मिनिटाला ८ लिटर पाण्याचा फवारा करू शकणारी यंत्रणा देखील आहे. मुंबईत धारावी, वांद्रे, भांडुप, कुर्ला, बेहराम पाडा घाटकोपर, विक्रोळी, मालाड, गोरेगाव, कांजूरमार्ग, वडाळा, अँटॉप हिल आदी ठिकाणी झोपडपट्टी परिसरात, दाट वस्तीत आग लागल्याची छोटी घटना घडल्यास अशा ठिकाणी तात्काळ ही “फायर बाईक” पोहोचेल व त्यावरील जवान बचावकार्य युद्धपातळीवर करू शकणार आहेत.


हेही वाचा : मुंबई शहरासह उपनगरात लोकसंख्येनुसार समान पाणी वाटप करा, भाजप आमदाराचे पालिका आयुक्तांना पत्र

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -