घरमुंबईबीएसएनएलच्या ग्राहकांसाठी खुशखबर; सणाच्या मुहुर्तावर नवीन प्लॅन

बीएसएनएलच्या ग्राहकांसाठी खुशखबर; सणाच्या मुहुर्तावर नवीन प्लॅन

Subscribe

बीएसएनएलने सणाच्या मुहुर्तावर ग्राहकांसाठी नवीन प्लॅनची ऑफर आणली आहे. यामध्ये ७८ रुपयांत ग्राहकांना अनलिमिटेड डाटा आणि कॉलिंग करता येणार आहे.

सार्वजनीक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच बीएसएनएल यांनी दसऱ्याच्या मुहुर्तावर ग्राहकांसाठी एक चांगली बातमी आणली आहे. त्यांनी ग्राहकांसाठी STV-७८ हा प्रीपेड रिचार्ज प्लॅन आणला आहे. बीएसएनएलच्या या नवीन प्लॅनची किंमत ७८ रुपये आहे. दुर्गा पूजा, दसरा आणि दिवाळी सणानिमित्त हा प्लॅन कंपनीने आपल्या ग्राहकांना आणला आहे. या प्लॅननुसार अनलिमिटेड व्हाइस कॉल, डेटा आणि व्हिडीओ कॉल्स करता येणार आहे.

रोमिंगमध्येही अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा

अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग अॅक्टिव्ह करण्यासाठी ग्राहकांना STV COMBO78 असा मेसेज १२३ या नंबरवर पाठवावा लागणार आहे. तसेच यामध्ये ग्राहकांना रोज २ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे. या प्लॅनची व्हॅलिडीटी १० दिवसांची असल्याचेही कंपनीने सांगितले आहे. म्हणजेच कंपनीकडून एकूण २० जीबी डेटा दिला जाणार आहे. हा प्लॅन १५ ऑक्टोबरपासून लागू करण्यात आला असून देशभरातील ग्राहकांना ३ जी सुविधेअंतर्गत याचा लाभ घेता येणार आहे. विशेष म्हणजे रोमिंगमध्येही अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -