घरमुंबईबेस्टच्या वीज ग्राहकांसाठी अद्ययावत 'कॉलसेंटर'!

बेस्टच्या वीज ग्राहकांसाठी अद्ययावत ‘कॉलसेंटर’!

Subscribe

मुंबईच्या बेस्ट ग्राहकांसाठी आता कॉलसेंटरची सुविधा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे बेस्टच्या फॉल्ट कंट्रोल आणि फ्युज कंट्रोलची माहिती एसएमएसच्या स्वरूपात ग्राहकांना मिळणार आहे. ही सुवधा २४ तास सुरू राहणार आहे.

मुंबईतील दहा लाख वीज ग्राहकांना आता बत्ती गुल झाल्यानंतर वीज पुरवठा पूर्ववत होण्याचे अपडेट्स मिळणार आहेत. बेस्टच्या रामभरोसे फॉल्ट कंट्रोल आणि फ्युज कंट्रोलकडून नेमकी माहिती एसएमएसच्या स्वरूपात मिळेल. हे केवळ कॉल सेंटरच्या सेवेमुळे शक्य होणार आहे. पावसाळ्याच्या कालावधीत मुंबई शहरात वारंवार वीज पुरवठा खंडीत झाल्याने बेस्ट समिती अध्यक्षांना ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. मध्यरात्री 3 वाजेपर्यंत ग्राहकांनी केलेली अध्यक्षांची झोपमोड पाहता बेस्ट उपक्रमाने यामधून आता धडा घेतला आहे.

२४ तास कॉल सेंटर सुविधा

बेस्टच्या फॉल्ट सेंटर तसेच फ्युज सेंटरच्या ठिकाणी सलग एक ते दीड तास इतक्या मोठ्या कालावधीसाठी वीज ग्राहकांचे फोन स्विकारले जात नाहीत, असा अनुभव वीज ग्राहकांचा आला आहे. पावसाळ्यात वीज पुरवठा खंडीत होण्याच्या तक्रारी वाढताना पाहून वीज ग्राहकांनी बेस्ट उपक्रमामार्फत मुंबईतील वीज ग्राहकांसाठी कॉल सेंटरची नेमणूक करण्यात येणार आहे. या सेंटरमध्ये २४ तास बेस्टच्या वीज ग्राहकांना वीज पुरवठ्याबाबतची तक्रार करता येईल, तसेच माहितीही मिळवता येईल. बेस्टच्या कुलाबा ते माहिम तसेच सायनपर्यंतच्या वीज ग्राहकांना या सुविधेचा लाभा मिळेल. कॉल सेंटरच्या सुविधेसाठी सायसेक्युअर या कंपनीची नियुक्ती करण्याचा बेस्टचा मानस आहे. पाच वर्षाच्या कालावधीसाठी या कॉलसेंटरची नेमणूक करण्यात येणार आहे.

- Advertisement -

एकाच ठिकाणी तक्रारींची नोंद

वेब चॅट, सोशल मीडिया, इंटिग्रेटेड व्हॉईस रिस्पॉन्सिव्ह सिस्टिम (आयव्हीआरएस) यासारख्या सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येतील. वीज ग्राहकांकडून आलेल्या तक्रारी सरासरी २० मिनिटे ते ३० मिनिटांमध्ये सोडवण्याचा आमचा मानस असेल, अशी माहिती सायफ्युचर कंपनीच्या प्रतिनिधी जानकी घरत यांनी दिली. ग्राहकांची विजेची तक्रार सोडवण्यासाठी लोकेशनवर आधारीत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे एकाच ठिकाणाहून येणाऱ्या तक्रारी सोडवण्यासाठी याचा वापर करणे शक्य होईल. वीज पुरवठा खंडीत झाल्यावर ग्राहकांचे नेमके ठिकाण शोधण्यासाठी याचा उपयोग होईल. आयव्हीआरएस सिस्टिमच्या माध्यमातून ग्राहकांना वीज पुरवठ्याबाबतची माहिती एसएमएसच्या माध्यमातून देण्यात येईल.

महापालिकेच जीआयएस

मुंबई महापालिकेकडून जीआयएस सिस्टिमचा परवाना मिळवण्यासाठीची तयारी बेस्ट उपक्रमाने केली आहे, अशी माहिती बेस्ट उपक्रमाचे व्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी दिली. या तंत्रज्ञानाचा उपयोग हा ग्राहकांना वीज पुरवठ्याबाबतचा अंदाज मांडण्यासाठी होईल. तसेच देखभाल दुरूस्तीच्या कामाची माहितीदेखील जीआयएसच्या माध्यमातून देता येणे शक्य होईल. वीज ग्राहकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी सध्या उपक्रमाने मोबाईल वॅनची नेमणूक केली आहे, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -