घरमनोरंजनपुष्कर की आस्ताद - नवा कॅप्टन कोण?

पुष्कर की आस्ताद – नवा कॅप्टन कोण?

Subscribe

पुष्कर आणि आस्तादने चांगली कामगिरी केल्यामुळे आज दोघांमध्ये कॅप्टन्सी कार्य रंगणार आहे. या दोघांपैकी कोण बनणार कॅप्टन?

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये “होऊ दे चर्चा” हे साप्ताहिक कार्य आठवडाभर रंगले. या कार्यानुसार पुष्कर, आस्ताद, मेघा आणि सई यांनी बऱ्याच ब्रेकिंग न्यूज दिल्या. “होऊ दे चर्चा” या टास्कमध्ये आऊंनी अनिल थत्ते आणि स्वतःबद्दल एक ब्रेकिंग न्यूज दिली. तर, पुष्करने त्याच्या चाहत्यांसाठी पोल डान्स करून प्रेक्षकांना खास मनोरंजनाची मेजवानी दिली. टास्कदरम्यान आस्तादची मेघा आणि सई बरोबर शाब्दिक चकमक झाली. त्या दोघींनी घेतलेला निर्णय आस्तादला पटला नाही आणि त्या विचारसरणीला विरोध दर्शवून त्याने निषेध केला. आस्तादने केलेल्या विरोधामुळे मेघा आणि सईने त्यांचा निर्णय बदलून शर्मिष्ठाचे नावं ब्रेकिंग न्यूज मधून काढून आऊ आणि पुष्करचे नावं अंतिम केले.

पुष्कर आणि आस्तादमध्ये कॅप्टन्सीसाठी लढत

पुष्करच्या बातम्या “होऊ दे चर्चा” या टास्क मध्ये चार वेळा सर्वोत्तम बातम्या ठरल्यामुळे तो कॅप्टनसीचा पहिला उमेदवार ठरणार आहे. तसेच बिग बॉस मेघा, आस्ताद आणि सई मधून घरातील सदस्यांच्या मताने कोणा एका सदस्याची कॅप्टनसीच्या उमेदवारीसाठी निवड करायला सांगणार आहेत. यावरूनच बिग बॉस मराठीच्या घरामध्ये बरेच वाद रंगणार आहेत. मेघा आणि शर्मिष्ठाने आपले मत आस्तादला दिल्यामुळे सई आज मेघा, आऊ आणि शर्मिष्ठा वर नाराज होणार आहे. आता त्यांची तिला या स्पर्धेमध्ये गरज नाही आणि तिच्याकडून कुठल्याही प्रकारचा पाठींबा यापुढे त्यांनी मागू नये असे सई त्यांना सांगणार आहे. तर पुष्कर आणि आस्तादमध्ये कोण नवा कॅप्टन होईल हे आजच्या भागात कळेल.

- Advertisement -

‘एक डाव नावाचा’ कॅप्टनसी कार्य

कॅप्टनमध्ये किती सहनशीलता आहे यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठीच आज बिग बॉस “एक डाव नावाचा” हे कॅप्टनसीचे कार्य सोपवणार आहेत. कॅप्टन या शब्दाचे महत्त्व अधोरेखित करणे हा या कार्याचा उद्देश आहे. बिग बॉस मराठीच्या घराचा नवा कॅप्टन कोण बनणार? मेघा आणि सईचे भांडण कोणते टोक गाठणार? हीच रंगत आजच्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -