घरमुंबईशाळेत प्रवेश झाला, पण जाता येईना; मुंबईच्या २०० विद्यार्थ्यांचं नुकसान!

शाळेत प्रवेश झाला, पण जाता येईना; मुंबईच्या २०० विद्यार्थ्यांचं नुकसान!

Subscribe

म्हाडाने शाळेची जमीन परस्पर खासगी शाळा संस्थेला दिल्यामुळे पालिका शाळेतल्या तब्बल २०० विद्यार्थ्यांना प्रवेश होऊनही शाळेत जाता येत नाहीये. पालिकेची ही शाळा गेल्या १५ दिवसांपासून बंद अवस्थेतच आहे. शिवसेनेच्या नगरसेविका राजुल पटेल यांनी आक्षेप घेतल्यामुळे शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं लोखंडवाला सिटिझन असोसिएशनचे ट्रस्टी राकेश कोएल्हो यांनी सांगितलं आहे.

जून महिना म्हणजे शाळांचा महिना. सर्वच शाळकरी मुलांच्या घरी हा महिना गडबडीचा असतो. पण मुंबईत अशी एक शाळा आहे, जिथल्या २०० विद्यार्थ्यांना शाळा सुरू होऊनही शाळेत जाताच येत नाहीये. आणि याला कारण आहे पालिका, खासगी एनजीओ आणि शिवसेनेमध्ये कोर्टात सुरू असलेली केस. अंधेरीच्या आदर्श नगर परिसरात पालिकेच्या ताब्यातल्या भूखंडावरून हा सगळा वाद सुरू झाला आहे. या भूखंडावर असलेल्या खासगी शाळेवर आक्षेप घेत शिवसेनेच्या नगरसेविका राजुल पटेल यांनी इथे पालिकेची शाळा असायला हवी अशी मागणी केली आहे. यासंदर्भात संबंधित एनजीओने कोर्टात याचिका दाखल केली आहे. मात्र, हा सगळा प्रकार सुरू असताना इथल्या २०० विद्यार्थ्यांचं मात्र नुकसान होत आहे. कारण, या वादाच्या पार्श्वभूमीवर शाळा १५ दिवसांपासून बंदच आहे!

२०० विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला

हा प्रकार घडतोय आदर्श नगरमधल्या जेबीसीएन शाळेच्या जमिनीवरून! जेबीसीएन शाळेच्या पाठीमागेच महापालिकेच्या पहिली ते सातवी अशा सात तुकड्यांची स्वतंत्र शाळा आहे. आणि याच शाळेत प्रवेश घेतलेल्या २०० विद्यार्थ्यांचं भवितव्य अधांतरी टांगलं गेलं आहे. हा सगळा वाद सुरू असल्यामुळे गेल्या १५ दिवसांपासून ही शाळा बंदच ठेवण्यात आली आहे. त्यामुळे शाळा सुरू होऊनही विद्यार्थ्यांना मात्र अद्याप शाळेत जाता आलेलं नाही.

- Advertisement -

पालिकेला मिळाली ७ तुकड्यांची शाळा

म्हाडाने सध्या शाळा उभी असलेली जमीन जेबीसीएन या खासगी संस्थेला शाळेसाठी हस्तांतरीत केली. यानंतर जेबीसीएन ही खासगी इंग्लिश मीडियम शाळा तिथे सुरू झाली. याचबरोबर शाळेच्या पाठीमागेच पहिली ते सातवी अशा ७ तुकड्यांची शाळाही संस्थेने पालिकेला बांधून दिली. लोखंडवाला सिटिझन असोसिएशनकडून या शाळेचा कार्यभार पाहिला जातो. मात्र, यावरच शिवसेनेच्या नगरसेविका राजुल पटेल यांनी आक्षेप घेतला आहे.

Parents gets angry after school close for 15 days
पालक आणि विद्यार्थ्यांची शाळेबाहेर गर्दी

विद्यार्थ्यांचे प्रवेश नियमानुसारच

लोखंडवाला सिटिझन असोसिएशनचे ट्रस्टी कॅ. राकेश कोएल्हो यांनी केलेल्या दाव्यानुसार या शाळेची जमीन त्यांनी उच्च न्यायालयात मोठ्या प्रयत्नांनंतर जिंकली आहे. तसेच, ठरल्यानुसार ७ तुकड्यांची शाळाही जेबीसीएनकडून ताब्यात घेतली आहे. १४ जूनपासून ही शाळा सुरू असून २०० विद्यार्थ्यांचे प्रवेशही झाले आहेत. मात्र, शिवसेनेकडून या शाळेला विरोध केला जात आहे. २० जूनला शाळेचा शुभारंभ होणार होता.

शिवसेनेच्या नगरसेविका राजुल पटेल यांनी शाळेत येऊन मनपा शिक्षिका कुंनुद पटेल, विद्यार्थी, पालक यांच्या समक्ष वाद घातला. त्यामुळे शाळा 1५ दिवस बंद ठेवण्यात आली आहे. या सर्व प्रकरणाचा पाठपुरावा चालू आहे. विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून महापालिका प्रशासन आणि न्यायालयात आमचा लढा सुरु आहे.

कॅ. राकेश कोएलो, ट्रस्टी, लोखंडवाला सिटिझन असोसिएशन

- Advertisement -

 

जमीन पालिकेची, शाळाही पालिकेचीच हवी

एकीकडे ट्रस्टकडून करारानुसार १५% जागेवर पालिका शाळेच्या तुकड्या बांधून घेतल्याचं सांगितलं जात असतानाच शिवसेनेने मात्र त्याचा विरोध केला आहे. जेबीसीएन आणि पालिका शाळेच्या ७ तुकड्या मिळून ही संपूर्ण जमीन पालिकेची आहे. त्यामुळे तिथे पालिकेचीच शाळा बांधली जावी, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

जेबीसीएनची शाळा दहावीपर्यंत आहे, पण पालिकेची शाळा सातवीपर्यंतच आहे. शिवाय पालिकेसाठीची शाळा जेबीसीएनच्या पाठीमागे आहे. महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा भूखंड घोटाळा झाला आहे. या घोटाळ्याची चौकशी करावी, अशी मागणी आम्ही पालिका आयुक्त, महापौर आणि शिक्षण विभागाला केली आहे.

राजुल पटेल, नगरसेविका, शिवसेना

मुलांचा काय दोष?

दरम्यान, शाळा प्रशासन, शिवसेना आणि खासगी ट्रस्ट यांच्या वादामध्ये पालिकेच्या २०० विद्यार्थ्यांचं मात्र मोठं नुकसान होत आहे. त्यामुळे हा वाद त्वरीत मिटवून मुलांचं शैक्षणिक वर्ष पुन्हा सुरू करावं, अशीच प्रतिक्रिया या विद्यार्थ्यांचे पालक देत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -