घरमुंबई'मोदींवर चित्रपट बनवणाऱ्या संदीप सिंहचे भाजप कनेक्शन, सीबीआयने चौकशी करावी'

‘मोदींवर चित्रपट बनवणाऱ्या संदीप सिंहचे भाजप कनेक्शन, सीबीआयने चौकशी करावी’

Subscribe

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच संदीप सिंह याचे नाव समोर आले आहे. संदीप सिंह याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर बायोपिक बनवला होता. त्यामुळे संदीप सिंहचा भाजपाशी संबंध असल्याचा आरोप काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा संदीप सिंहबरोबरचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. तेव्हापासूनच संदीप सिंहच्या भाजप कनेक्शनची चर्चा रंगू लागली आहे. यावर आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली असून संदीप सिंह आणि भाजप कनेक्शनची चौकशी सीबीआयने करावी, असे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

काय म्हणाले अनिल देशमुख

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर चित्रपट बनवणारा संदीप सिंह आणि भाजपा यांचे संबंध असून त्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. काही जणांनी तशी विनंतीही केली आहे. त्याचा संबंध बॉलिवूड आणि ड्रग्ज प्रकरणाशीही आहे. त्यामुळे या प्रकरणाचीही चौकशी करण्याची विनंती मी सीबीआयकडे करणार आहे.

संदीप सिंहचे नाव समोर आल्यानंतर भाजपाचे आमदार राम कदम यांनी बॉलिवूडमधील अंमली पदार्थांच्या रॅकेटची चौकशी करावी, अशी मागणी केली होती. कदम यांनी मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात पत्रही पाठवले होते. त्यावर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा संदीप सिंहबरोबरचा फोटो पोस्ट करत या प्रकरणामध्ये राज्य सरकारने भाजपा अँगलनेही तपास करावा, अशी मागणी केली होती.

- Advertisement -

हेही वाचा –

तरुणाचं भन्नाट प्रसंगावधान; लाल अंडरविअरमुळे टळला भीषण रेल्वे अपघात!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -