घरमुंबईSushant Singh Death : 'त्याच्या गळ्यावर १५ ते २० सुयांच्या खुणा होत्या!'

Sushant Singh Death : ‘त्याच्या गळ्यावर १५ ते २० सुयांच्या खुणा होत्या!’

Subscribe

एकीकडे सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचं गूढ दिवसेंदिवस वाढतच असताना या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होताना दिसत आहेत. CBI ची टीम या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. या पार्श्वभूमीवर रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) सोबतच या प्रकरणातील इतर संबंधितांची देखील सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. मात्र, असं असताना शनिवारी सुशांतची बहीण Shweta Singh Kirti ने आपल्या ट्वीटर अकाऊंटवर न्यूज नेशन या चॅनलचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये रुग्णालयाचा कर्मचारी असल्याचा दावा करणारी एक व्यक्ती सुशांत सिंह राजपूतच्या मृतदेहावर सुयांच्या खुणा असल्याचं सांगत आहे. त्यावर, ‘हे देवा, त्यांनी माझ्या भावासोबत काय काय केलं आहे? त्यांना अटक व्हायला हवी’, असं ट्वीट श्वेताने केलं आहे.

सुशांतच्या मृतदेहावर कसल्या खुणा?

दरम्यान, पोस्टमार्टेम अहवालानुसार सुशांत सिंह राजपूतच्या मृतदेहावर गळफासाच्या खुणेशिवाय अजून कोणतीही खूण किंवा जखम नव्हती. मात्र, या व्यक्तीच्या दाव्यानुसार, सुशांतच्या गळ्यावर तब्बल १५ ते २० सुया टोचल्याच्या खुणा होत्या. शिवाय, त्याचा पाय देखील तुटलेल्या अवस्थेत होता. त्याच्या गळ्याला टेप चिकटवलेला होता. जेव्हा त्याचा मृतदेह कूपर रुग्णालयात पोस्टमार्टेमसाठी नेण्यात आला, तेव्हा त्याचा पाय दुमडलेला होता. हे दावे समोर आल्यानंतर या प्रकरणात मोठी खळबळ उडण्याची शक्यता आहे. सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या होती की हत्या? या मुद्द्यावरून सध्या वाद आणि राजकारणही सुरू असताना अशा प्रकारचा दावा समोर आल्यामुळे या वादाला अधिकच खतपाणी घातलं गेल्याचं बोललं जात आहे.

- Advertisement -

सुशांतचा मृतदेह पिवळा पडला होता…

सुयांच्या खुणांसोबतच सुशांतचा मृतदेह पिवळा पडला होता असा दावा देखील या व्यक्तीने केला आहे. ‘आम्हाला मृतदेहाची परिस्थिती लगेच लक्षात येते. गळफास घेतल्यानंतर मृतदेह पिवळा पडत नाही. पण आम्ही जेव्हा सुशांतचा मृतदेह रुग्णवाहिकेतून कूपर रुग्णालयात नेत होतो, तेव्हा त्याचा मृतदेह पिवळा पडला होता’, असं या व्यक्तीचं म्हणणं आहे. त्यामुळे नक्की सुशांतसोबत काय झालं होतं? याविषयीचं गूढ अधिकच वाढलं आहे.


हेही वाचा – Sushant Suicide Case: सुशांतचा केअर टेकर आणि रुममेट होणार माफीचे साक्षीदार?
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -