घरट्रेंडिंगतरुणाचं भन्नाट प्रसंगावधान; लाल अंडरविअरमुळे टळला भीषण रेल्वे अपघात!

तरुणाचं भन्नाट प्रसंगावधान; लाल अंडरविअरमुळे टळला भीषण रेल्वे अपघात!

Subscribe

कधीकधी गंभीर प्रसंगात फक्त प्रसंगावधान दाखवल्यामुळे शेकडो लोकांचे प्राण वाचू शकतात आणि मोठमोठ्या दुर्घटना टळू शकतात. जगभरात अशा अनेक घटना घडल्या आहेत. पण उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद शहरात एका तरुणाने त्याच्या लाल रंगाच्या अंडरविअरमुळे एक मोठा रेल्वे अपघात होण्यापासून रोखल्याची घटना समोर आली आहे. या तरुणाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे त्याचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. विशेष म्हणजे या तरुणाने अगदी काही मिनिटांचा जरी उशीर केला असता, तर मोठी दुर्घटना होऊन ट्रेनमध्ये बसलेल्या शेकडो लोकांचे प्राण जाण्याचा भीषण धोका निर्माण झाला असता. ही दुर्घटना वेळीच टळल्यामुळे ट्रेनमधल्या सर्वच प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

तर त्याचं झालं असं, की…

शनिवारी अमृतसरहून हावडाला जाणारी एक ट्रेन जेव्हा गुलाबबाडी भागात आली, तेव्हा ट्रेनमधल्या एकाही प्रवाशाला याची सुतराम कल्पना नव्हती की त्यांच्यापुढे काय वाढून ठेवलं आहे. ट्रेनपासून काही अंतरावर रेल्वे ट्रॅक तुटलेल्या अवस्थेत होता. जर ही ट्रेन अशीच पुढे आली असती, तर तुटलेल्या ट्रॅकमुळे ट्रेनचे अनेक डबे खाली उतरले असते आणि मोठी दुर्घटना घडली असती.

- Advertisement -

मात्र, याचवेळी गुलाबबाडीमधला एक तरुण आंघोळीसाठी म्हणून त्या परिसरात आलेला असताना त्याला तुटलेला ट्रॅक दिसला. इतकंच नाही तर त्यातून स्पार्किंग होत असल्याचंही त्याला दिसलं. काही अंतरावरून प्रवाशांनी भरलेली एक ट्रेन धडधडत येत असल्याचं देखील त्यानं पाहिलं. योगायोगाने यावेळी त्याच्या हातात त्याची लाल रंगाची अंडरविअर देखील होती. वेळेचं गांभीर्य पाहून त्यानं हातातली अंडरविअरच हवेत फडकावक रेल्वे ट्रॅकवरून ट्रेनच्या दिशेनं धाव घेतली. लाल रंग फडकताना पाहून ट्रॅकमनला (रेल्वे चालक) काहीतरी गडबड असल्याचं जाणवलं आणि त्यानं तातडीने रेल्वे थांबवली.

शेवटी जेव्हा आपण कोणत्या संकटातून वाचलो आहोत, हे प्रवाशांना समजलं, तेव्हा सगळ्यांनीच तरुणाच्या प्रसंगावधानाचं कौतुक करायला सुरुवात केली. हा प्रकार समजल्यानंतर ट्रॅकचं दुरुस्ती काम तातडीने हाती घेण्यात आलं. ट्रॅक दुरुस्त झाल्यानंतर काही तासांनी ही ट्रेन पुन्हा मार्गस्थ झाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -