घरमुंबईकल्याणमध्ये आता चादर गँगची दहशत

कल्याणमध्ये आता चादर गँगची दहशत

Subscribe

आयफोनच्या दुकानातून दहा आयफोन लंपास केले आहेत. एका फोनची किंमत १ लाख १९ हजार आहे. तर दोन महागडे लॅपटॉप देखील या गँगने लंपास केले आहेत. या दुकानातून एकूण १८ लाखांचा ऐवज घेऊन चादर गँग पसार झाली आहे.

आत्तार्पयत आपण चड्डी – बनियन गँग, बाबू गँग, माकड टोपी गँगबद्दल ऐकले असेल. पण आत्ता एक नवीनच गँगचे नाव समोर आले आहे. तिचे नाव ऐकून तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल. चादर गँग असे या गँगचे नाव असून कल्याणमध्ये आता या गँगची दहशत पसरली आहे. ही गँग चादरीचा आसरा घेऊन दुकानाचे शटर तोडते आणि चोरी करतात. या चादर गँगमुळे कल्याणमधील दुकानदारांची झोप उडाली आहे. या चादर गँगने एका मोबाईलच्या दुकानावर मारलेला डल्ला सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

१८ लाखांचा ऐवज लंपास

कल्याण पश्चिमेतील लाल चौकी परिसरातील एका मोबाईल दुकानात या चादर गँगने चोरी केली आहे. तब्बल ५ लाखांचे मोबाईल या चादर गँगने लंपास केले आहेत. तर आयफोनच्या दुकानातून दहा आयफोन लंपास केले आहेत. एका फोनची किंमत १ लाख १९ हजार आहे. तर दोन महागडे लॅपटॉप देखील या गँगने लंपास केले आहेत. या दुकानातून एकूण १८ लाखांचा ऐवज घेऊन चादर गँग पसार झाली आहे. चोरीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाल्याने चादर गँगचा उलगडा झाला आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

- Advertisement -

चादर गँगचा शोध सुरु

चादर गँगमधील चार जण एका मोबाईल दुकानाजवळ येतात. त्यामधील एक जण चादर घेऊन उभा राहतो. तर तीन जण दुकानाचे शटर उघडण्याचा प्रयत्न करतात. मोबाईल दुकानाचे शटर थोडा वरती करुन त्यामधील एक जण दुकानात शिरतो. त्यानंतर शटर खाली घेतले जाते आणि तीन जण निघून जातात. दुकानात शिरलेल्या एक जण दुकानातील चांगले चांगले मोबाईल गोळा करतो अवघ्या ५ मिनिटात त्याने दुकानातील महागडे मोबाईल गोळा करुन परत शटरच्या बाहेर गेल्याचे पहायला मिळत आहे. या चादर गँगचा कल्याण पोलीस शोध घेत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -