घरमुंबईमध्य रेल्वेवर दोन दिवस मेगाब्लॉक

मध्य रेल्वेवर दोन दिवस मेगाब्लॉक

Subscribe

मध्य रेल्वेवर शनिवार, रविवार असा दोन दिवसीय मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे गाड्यांच्या वेळापत्रकात देखील बदल करण्यात आला आहे.

मध्य रेल्वेवर शनिवार आणि रविवार असा दोन दिवस मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी ६ आणि ७ ऑक्टोबर रोजी माटुंगा-मुलुंड डाऊन जलद मार्गावर मध्यरात्री १ ते सकाळी ६ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत डाऊन एक्स्प्रेस आणि मेल गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात येणार आहे. यात १२०५१ दादर-मडगांव जनशताब्दी एक्स्प्रेस, ५११५३ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस माटुंगा ते मुलुंड दरम्यान डाऊन धीम्या मार्गावरून धावणार आहे. यामुळे या गाड्या इच्छित स्थळावर या गाड्या पोहोचण्यासाठी २० मिनिटे उशिर होणार आहे.

या गाड्या होणार रद्द

मध्य रेल्वेवर या कालावधी दरम्यान काही उपनगरीय गाड्याही रद्द करण्यात येणार आहेत.

- Advertisement -
  • विद्याविहार येथून सकाळी ५.३९ वाजता प्रस्थान करणारी कुर्ला-कल्याण लोकल रद्द करण्यात आली आहे.
  • तसेच दादर येथून ६.४८ वाजता प्रस्थान करणारी दादर-कल्याण लोकल रद्द करण्यात येणार आहे.
  • याशिवाय दादर येथून ८.०७ वाजता प्रस्थान करणारी दादर-कल्याण लोकल दादर स्थानकाऐवजी विद्याविहार स्थानकावरून ८.२१ वाजता निघणार आहे.

हार्बर सेवा रद्द

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि वडाळा रोड येथून निघणाऱ्या हार्बर मार्गावरील काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि वडाळा रोड येथून ४.३२ ते ६.४६ पर्यंत प्रस्थान करणाऱ्या डाऊन हार्बर सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच पनवेल, बेलापूर आणि वाशी येथून ४.०३ ते ५.५९ पर्यंत प्रस्थान करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर सेवा देखील रद्द करण्यात आल्या आहेत.

  • वांद्रे आणि अंधेरी या स्थानकांसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ४.२६ ते ६.५१ पर्यंत प्रस्थान करणाऱ्या डाऊन हार्बर सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.
  • तसेच वांद्रे आणि अंधेरी येथून ५.१३ ते ६.१६ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे प्रस्थान करणाऱ्या अप हार्बर सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.

या मार्गावर विशेष लोकल सोडण्यात येणार

मेगा ब्लॉकच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कुर्ला आणि कुर्ला – पनवेल या मार्गावर विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत. या काळात हार्बर मार्गावरील प्रवाशांना मध्य (मुख्य) आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर प्रवास करण्याची अनुमती देण्यात आली आहे. तर या कालावधीत प्रवाशांनी सहकार्य करावे असे आवाहनही रेल्वे प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -