घरमनोरंजनडॉ. मोहन आगाशे यांना विष्णुदास भावे पुरस्कार जाहीर

डॉ. मोहन आगाशे यांना विष्णुदास भावे पुरस्कार जाहीर

Subscribe

अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीच्या वतीने देण्यात येणाऱ्या विष्णुदास भावे नाट्यपुरस्कारासाठी यंदा ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांची निवड करण्यात आली आहे.

अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीच्या वतीने देण्यात येणाऱ्या विष्णुदास भावे नाट्यपुरस्कारासाठी यंदा ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांची निवड करण्यात आली आहे. अनोख्या अभिनय शैलीच्या बळावर मराठीसह हिंदी चित्रपटांमध्येही आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या पद्मश्री डॉ. मोहन आगाशे यांना मराठी रंगभूमीदिनाचे औचित्य साधून ५ नोव्हेंबर रोजी हा पुरस्कार दिला जाणार आहे. नाट्यसंमेलनाध्यक्षा किर्ती शिलेदार यांच्या हस्ते डॉ. मोहन आगाशे यांना गौरविण्यात येणार असून २५ हजार रुपये, मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असणार आहे.

मराठी रंगभूमी दिनाचे महत्त्व

दरवर्षी ५ नोव्हेंबर हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. विष्णुदास भावे यांनी १८४३ साली ‘सीता स्वयंवर’ हे पहिले नाटक रंगभूमीवर सदर करून मराठी नाट्यसृष्टीचा पाया रचला. १९४३ साली या घटनेचे स्मरण म्हणून राज्यातील या क्षेत्रातील सर्व नामवंत एकत्र आले आणि सांगली येथे ५ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत शताब्दी महोत्सव साजरा करण्यात आला. या निमित्ताने ५ नोव्हेंबर रोजी नाट्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाचे अध्यक्ष वि. दा. सावरकर हे होते. याच दिवशी नाट्यविद्येच्या संवर्धनासाठी अखिल महाराष्ट्र नाट्यविद्या मंदिर समितिची स्थापना करण्यात आली. चिंतामणराव पटवर्धन यांनी दिलेल्या जागेवर विष्णुदास भावे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या नाट्यमंदिराची कोनशिला बसविण्यात आली. या महत्वाच्या क्षणी सर्व नाट्य रसिकांच्या साक्षीने सांगली येथे समितीने ठराव करून हा दिवस जाहीर केला.

- Advertisement -

विष्णुदास भावे गौरवपदक

मराठी रंगभूमी दिनी सांगलीची ‘अखिल महाराष्ट्र नाट्यविद्या मंदिर समिती’ १९६० सालापासून विष्णुदास भावे यांच्या स्मृत्यर्थ मराठी रंगभूमीवर दीर्घकाळ सेवा करणाऱ्या ज्येष्ठ कलाकाराला ‘विष्णुदास भावे गौरवपदक’ देऊन त्यांचा सन्मान करते. गौरव पदक, रोख रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप असते. आत्तापर्यंत हा पुरस्कार अमोल पालेकर, केशवराव दाते, ग. दि. माडगूळकर, छोटा गंधर्व, डॉ. जब्बार पटेल, जयंत सावरकर, ज्योस्ना भोळे, दाजी भाटवडेकर, दिलीप प्रभावळकर, दुर्गा खोटे, नानासाहेब फाटक, प्रभाकर पणशीकर, पु.श्री.काळे, फैयाज, बापूराव माने, बालगंधर्व, भालचंद्र पेंढारकर, महेश एलकुंचवार, माधव मनोहर, मामा पेंडसे, मास्टर कृष्णराव, रत्नाकर मतकरी, रामदास कामत, वसंत कानेटकर, विश्राम बेडेकर, शरद तळवलकर, शं.ना. नवरे, हिराबाई बडोदेकर, मोहन जोशी आणि आता डॉ. मोहन आगाशे यांना मिळाला आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -