घरदेश-विदेशसंविधान बदलणं म्हणजे घरातील भांडं बदलण्या इतकं...; प्रकाश आंबेडकर गरजले

संविधान बदलणं म्हणजे घरातील भांडं बदलण्या इतकं…; प्रकाश आंबेडकर गरजले

Subscribe

वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजप सरकारवर थेट हल्लाबोल केला. संविधान बदलण्याची चर्चा करून बदलण्याच्या मनसुभ्याचा त्यांनी तिखट शब्दांत समाचार घेतला.

मुंबई : येथील शिवाजी पार्क मैदानावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शिनावारी (25 नोव्हेंबर) रोजी आयोजित केलेल्या संविधान सन्मान कार्यक्रमात वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजप सरकारवर थेट हल्लाबोल केला. संविधान बदलण्याची चर्चा करून बदलण्याच्या मनसुभ्याचा त्यांनी तिखट शब्दांत समाचार घेतला. त्यांच्या भाषणाआधी कॉंग्रेसच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीसुद्धा संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्या भाजपवर हल्लाबोल केला होता. (Changing the constitution is like changing the pots in the house… Prakash Ambedkar needed)

येथील शिवाजी पार्क मैदानावर आयोजित केलेल्या संविधान सन्मान सभेला संबोधित करताना वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य होऊन सत्तर वर्ष उलटली आणि या सत्तर वर्षांनंतर 2024 मधील निवडणुकांसाठी या देशाचे संविधान बदलण्याची चर्चा सुरू झाली आहे. फेब्रुवारी, मार्चमध्ये लोकसभेच्या निवडणुका होतील, आणि या निवडणुकांच्या आगोदर या मुद्द्यावर चर्चा झाली पाहीजे असा आमचा आग्रह आहे. कॉंग्रेसला माझा आग्रह आहे की, कॉंग्रसनेही प्रत्येक राज्यात सभा घेऊन यावर चर्चा करावी, पण आम्हालाही त्या सभेत बोलवावं. आम्ही त्या संविधान बदलणाऱ्यांना विचारू की, संविधान का बदलता? बरं संविधान बदलता तर नवीन काय आणणार आहात? हे सांगा, तुम्ही म्हणता की, संविधान जुनं झालं आहे. बरं तुमचं म्हणणं खरं जरी मानलं तरी पण संविधान बदलणं म्हणजे घरातील एक भांड काढून दुसरं ठेवणं असं नाही. संविधान ही एक व्यवस्था आहे. तिला जर बदलता तर मग नवीन आणणार आहात त्याची चर्चा पण करत नाहीत. आज जी लोकशाही आहे ती बदलून ठोकशाही आणणार आहात का, संसदीय लोकशाही सोडून एकाधिकारशाही आणणार आहात? तर तिचाही आराखडा सांगा, लोकशाही कोणती आणणार तेही सांगा? असे प्रश्न विचार प्रकाश आंबेडकर यांनी संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यावर थेट हल्ला चढवला.

- Advertisement -

हेही वाचा : 3 डिसेंबरनंतर नरसंहार होण्याची शक्यता; प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली भीती

सांस्कृतिक नाही तर यांचा वैदिक राष्ट्रवाद

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ज्यांच्या मागेपुढे काहीच नाही त्यांनी ही चर्चा सुरू केली आहे. मी मागे मोहन भागवत यांना आव्हान दिलं होतं की, या देशातील राष्ट्रवाद सांस्कृतिक आहे की, भौगोलिक असे विचारले होते. तुम्ही सांस्कृतिक राष्ट्रवाद म्हणता तर मग ते भौगोलिक राष्ट्रवाद होत नाही. असे जर असले तर मग त्या राष्ट्रवादाला ब्रिटिश राजवट असेच म्हणावे लागेल असाही हल्ला प्रकाश आंबेडकर यांनी केला.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -