घरदेश-विदेश3 डिसेंबरनंतर नरसंहार होण्याची शक्यता; प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली भीती

3 डिसेंबरनंतर नरसंहार होण्याची शक्यता; प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली भीती

Subscribe

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, जनतेला माझे आवाहन आहे की, भडकवणाऱ्या संघटना खूप आहेत. त्यांना बळी पडू नका,

मुंबई : आज आरक्षणाच्या नावावरून एकमेकांना एकमेंविरोधात लढवलं जात आहे. ही परिस्थित थांबविण्याऐवजी त्याला खतपाणी घातलं जात आहे. 2004 मध्ये गोधरा झालं, 2023 मध्ये मणिपूर झालं आता तीन डिसेंबरनंतर देशातील कोणत्या ना कोणत्या राज्यात नरसंहार होण्याची शक्यता आहे. अशी भीती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली. (Genocide likely after December 3 Prakash Ambedkar expressed fear)

वंचित बहुजन आघाडीने शनिवारी (25 नोव्हेंबर) आयोजित केलेल्या संविधान सन्मान महासभेत ते शिवाजी पार्कवरून बोलत होते.

- Advertisement -

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, जनतेला माझे आवाहन आहे की, भडकवणाऱ्या संघटना खूप आहेत. त्यांना बळी पडू नका, भडकवणाऱ्या नेत्यांना म्हणा की, तुमचा मुलगा आधी पुढे करा, अन् मग आम्ही त्याच्या पाठीमागे येतो. स्वतःचे कुटुंब सेफ ठेवायचं आणि लोकांना पेटवायचं अशी परिस्थिती आहे. त्यापासून आपण सावध राहलं पाहीजे. सत्ता जशी जात चालली आहे तसतशी कार्यक्रम बदलत आहेत. आता सगळ्याच गोष्टींचा वापर केल्या जात आहे. आज मी पाहले की, देशात अनेक ठिकाणी धाडी पाडण्यात आल्या, त्यांची चौकशी झाली पण त्यांना कोर्टात उभं केलं नाही. त्यांना लटकवत ठेवलं आहे. या देशात भीती निर्माण करण्याचा हा एक प्रयत्न आहे.

हेही वाचा : 26/11 Terrorist Atack : ‘त्या’ काळ्या आठवणींना रविवारी 15 वर्ष पूर्ण; आता मुंबईची सुरक्षा…

- Advertisement -

…त्यामुळेच संविधान बदलण्याची भाषा

जेलमध्ये टाकू अशा धमक्या देऊन येथील व्यवस्था काबीज करण्याची प्रक्रिया राबवली जात आहे. पण आपण निवडून दिले ते आपले नोकर आहे हे समजा, पण दुर्दैवाने आपण ती भूमिका विसरलो आहोत. आपण सरकारला विचारायला हवे की, ज्यांच्यावर धाडी टाकल्या त्यांच्यावर गुन्हे का दाखल केले नाही. पण आपण ते करत नाही. त्यामुळेच हे संविधान बदलण्याची चर्चा करत आहेत. म्हणजे आपण निर्माण केले की, मग दहशत पसरविण्यास मोकळे असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे केंद्रातील भाजपला टोला लगावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -