घरमुंबईमुख्यमंत्र्यांच्या त्या वक्तव्याने चंद्रकांत दादांचे तोंड पडले

मुख्यमंत्र्यांच्या त्या वक्तव्याने चंद्रकांत दादांचे तोंड पडले

Subscribe

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी आणि उद्धव ठाकरे जे पत्रकार परिषदेत बोललो तेच खरे समजा, असे सांगितल्याने मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसलेल्या महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचे तोंड बघण्यासारखे झाले होते.

युतीच्या मुख्यमंत्री पदाच्या फॉर्म्युलयावरून पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात चांगलीच जुंपल्याचे पहायला मिळत होते. मात्र आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी आणि उद्धव ठाकरे जे पत्रकार परिषदेत बोललो तेच खरे समजा, असे सांगितल्याने मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसलेल्या महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचे तोंड बघण्यासारखे झाले होते. युतीच्या मुख्यमंत्री पदाच्या फोर्म्युल्याबाबत जर रामदास कदम आणि चंद्रकांतदादा पाटील यांनी काही वक्तव्य केले आणि त्यात जर काही तफावत वाटत असेल तर माझे आणि उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य अंतिम आहे, हे मानावे, असे मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पार पडलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केले.

दोन्ही नेत्यांच्या वक्तव्याने झालेल्या वादावर पडदा 

विधानसभेत युतीमध्ये ज्याचा एक आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री, अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्री वाटप असा कोणताही फॉर्म्युला नाही, अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्यानंतर संतापलेल्या रामदास कदम यांनी अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री ही जर अट मान्य नसेल तर युती तोडा दिल्यानंतर पून्हा एकदा शिवसेना-भाजपा मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारी वरून आमने सामने आल्याचे पहायला मिळाले होते. मात्र या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यानंतर झालेल्या वादावर मुख्यमंत्र्यांनी पडदा टाकला.

- Advertisement -

काय म्हणाले होते चंद्रकांत दादा

निवडुन आलेल्या आमदारांच्या संख्येवरून सत्ता स्थापन करतांना मंत्रिपद वाटपाचे सूत्र असेल असे सांगत लोकसभेसाठी शिवसेनेला एक जादा जागा सोडली आहे, कोणती जागा हे अजून ठरायचे असल्याचे त्यांनी सांगितले होते. तसेच
रावसाहेब दानवे यांना अर्जुन खोतकर विरोध करत आहेत यावर देखील चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले. दानवे नेहमी निवडणूक जिंकतात, ते आताही जिंकतील असे देखील चंद्रकांत पाटील म्हणाले होते. दरम्यान चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर रामदासकदम यांनी जसास तसे उत्तर दिले होते. ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री ही अट ठेवली तर आमदार पाडापाडीचे धंदे सुरू होतात म्हणून आम्ही अडीज अडीज वर्ष मुख्यमंत्री अशी अट उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसमोर ठेवल्याचे रामदास कदम यांनी सांगितले. मुख्यमंत्री, अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला आहे. त्यामुळे एकटे चंद्रकांत पाटील म्हणजे भाजपा नाही असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -