घरमुंबईउलटा चोर कोतवाल को डाँटे; 'निर्भया'वरून चित्रा वाघ महाविकास आघाडीवर बरसल्या

उलटा चोर कोतवाल को डाँटे; ‘निर्भया’वरून चित्रा वाघ महाविकास आघाडीवर बरसल्या

Subscribe

चित्रा वाघ म्हणाल्या, महाविकास आघाडी सरकारच्या काळातही निर्भया पथकासाठी गाड्या घेण्यात आल्या. ४ फेब्रुवारी २०२२२ रोजी गाड्या खरेदी करण्यात आल्या तर १९ मे २०२२ रोजी त्याचे वाटप करण्यात आले.  १२१ गाड्या ९४ पोलीस ठाण्यांना देण्यात आल्या. ९ गाड्या महाविकास आघाडीच्याा मंत्र्यांच्या ताफ्यात होत्या. छगन भुजबळ, सुनील तटकरे, विजय वड्डेटीवार, सुनील केदारे, सुभाष देसाई यांच्या ताफ्यात या गाड्या होत्या.

मुंबई: निर्भया पथकातील गाड्या महाविकास आघाडी सरकारनेही मंंत्र्यांच्या दिमतीला ठेवल्या होत्या असा, आरोप भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सोमवारा केला. निर्भया पथकातील गाड्या शिंदे-फडणवीस सरकारने मंत्र्यांच्या दावणीला बांधल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी केला. त्याला चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले.

चित्रा वाघ म्हणाल्या, महाविकास आघाडी सरकारच्या काळातही निर्भया पथकासाठी गाड्या घेण्यात आल्या. ४ फेब्रुवारी २०२२२ रोजी गाड्या खरेदी करण्यात आल्या तर १९ मे २०२२ रोजी त्याचे वाटप करण्यात आले.  १२१ गाड्या ९४ पोलीस ठाण्यांना देण्यात आल्या. ९ गाड्या महाविकास आघाडीच्याा मंत्र्यांच्या ताफ्यात होत्या. छगन भुजबळ, सुनील तटकरे, विजय वड्डेटीवार, सुनील केदारे, सुभाष देसाई यांच्या ताफ्यात या गाड्या होत्या. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना अशा तिन्ही पक्षाच्या मंत्र्यांना निर्भया पथकातील गाड्या वाटण्यात आल्या. असे असताना शिंदे-फडणवीस सरकारवर आरोप करणे कितपत योग्य आहे, असा सवाल चित्रा वाघ यांनी केला.

- Advertisement -

महाविकास आघाडीच्या काळात निर्भया पथकातील काही गाड्या संबंध नसलेल्या खात्यातही देण्यात आल्या. तर काही गाड्यांचा वापर व्हीव्हीआयपी ताफ्यात करण्यात आला, असा आरोप चित्रा वात्र यांनी केला.

जुलैमध्ये मोटार वाहन विभागाने मुंबई पोलिसांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील ४० आमदार आणि १२ मंत्र्यांना ‘Y+’ सुरक्षा देण्यासाठी ४७ बोलेरो उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. तर व्हीआयपी सुरक्षा विभागाने तातडीनेही ही सुरक्षा व्यवस्था करण्याची विनंती केली होती. यानंतर शिंदे गटातील आमदार आणि मंत्र्यांना वाहने देण्यात आली. मात्र यातील ४७ बोलेरो पैकी १७ गाड्या परत आल्या पण ३० गाड्या अजून परत आल्याच नाहीत. यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली होती.

- Advertisement -

ताई तुम्ही सुद्धा…

निर्भया पथकातील गाड्या शिंदे-फडणवीस सरकारने मंत्र्यांसाठी वापरल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. चित्रा वाघ यांनी यावर पलटवार केला. त्या म्हणाल्या, महाविकास आघाडी सरकारच्या काळात निर्भया पथकातील वाहन सुप्रिया सुळे यांच्या ताफ्यातही वापरण्यात आले. त्यादेखील त्यावेळी लाभार्थी होत्या. त्यामुळे ताई तुम्ही सुद्धा असा खोचक टोलाही वाघ यांनी हाणला.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -