घरमुंबई'सायन्स कार्निव्हल'ची धूम; भविष्यातील अत्याधुनिक दुनियेत हरवले कल्याणकर!

‘सायन्स कार्निव्हल’ची धूम; भविष्यातील अत्याधुनिक दुनियेत हरवले कल्याणकर!

Subscribe

महाविद्यालयाऐवजी शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांना भविष्यातील तंत्रज्ञानाची ओळख व्हावी या उद्देशाने केम्ब्रिया शाळेतर्फे कल्याणात 'सायन्स कार्निव्हल' पार पडले.

इन्फॉर्मेशन-टेक्नॉलॉजीने आपल्या आयुष्यात इतका बदल घडवून आणला आहे की, भविष्य कसे असेल असा प्रश्न प्रत्येकालाच पडला आहे. महाविद्यालयाऐवजी शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांना भविष्यातील तंत्रज्ञानाची ओळख व्हावी या उद्देशाने केम्ब्रिया शाळेतर्फे कल्याणात शनिवारी- रविवारी ‘सायन्स कार्निव्हल’ पार पडले. या कार्निव्हलमध्ये एकाहून एक सरस अशा प्रोजेक्ट सादर करण्यात आले होते. त्यामुळे कार्निव्हलच्या माध्यमातून भविष्यातील अत्याधुनिक दुनियेच्या सफरीमध्ये कल्याणकर हरवून गेलेले पाहायला मिळाले आहेत.

सायन्स कार्निव्हलमध्ये केम्ब्रिआ शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केले प्रयोग

सायन्स प्रदर्शन म्हटलं की काही विषय-प्रयोग तसे ठरलेले असतात. मात्र, कल्याणात झालेल्या या सायन्स कार्निव्हलमध्ये केम्ब्रिआ शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले प्रयोग हे इतरांपेक्षा केवळ वेगळेच नव्हते. तर त्या प्रत्येक प्रयोगातून भविष्यातील तंत्रज्ञानाची चुणूक दिसत होती. मग तो सॅटेलाईट बनवण्याचा प्रयोग असो की ड्रोन आणि हेलिकॉप्टर बनवण्याचा. या प्रयोगांकडे लोकं आणि विद्यार्थी आकर्षित झाले नसते तर नवलच. या प्रयोगांबरोबरच आणखी एक असा प्रयोग होता जी याठिकाणी आलेल्या लोकांचे लक्ष वेधत होता. तो म्हणजे स्वछता करणारा रोबोट. ज्याठिकाणी मनुष्य पोहचू शकत नाही अशा ठिकानांचीही अत्यंत सफाईदारपणे स्वछता हा रोबोट करू शकतो. त्याचबरोबर भविष्यातील शेती तंत्रज्ञान, वाहतूक व्यवस्था, स्मार्ट मशिन्स आदी ३४ प्रकारचे वेगवेगळे प्रयोग यामध्ये मांडण्यात आले होते. तर मुंबईतील नेहरू तारांगणप्रमाणेच याठिकाणीही भव्य कापडी डोम उभारण्यात आला होता. ज्यामध्ये थ्री डी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्रह ताऱ्यांचा अद्भुत माहितीपट बघण्यासाठीही मुलांबरोबरच त्यांच्या पालकांनी मोठी गर्दी केली होती. या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन आणि त्याची आखणी पोटे ग्रुपचे सीएमडी बिपीन पोटे यांच्या संकल्पनेतून करण्यात आली होती.

- Advertisement -

महाविद्यालयाऐवजी शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांना भविष्यातील तंत्रज्ञानाची ओळख व्हावी हा प्रमुख उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शाळेतर्फे देण्यात आली. तर हे अनोखे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी केम्ब्रिआ शाळेच्या ट्रस्टी मीनल पोटे, मुख्याध्यापिका हिना फाळके यांच्यासह अमोल शिंदे, लता शेट्टी, बिना नायर आणि सर्वच शिक्षक, सहकारी तसेच इतर सदस्यांनी विशेष मेहनत घेतली होती.


हेही वाचा – ख्रिसमस, थर्टी फर्स्टला यंदा ‘फुल्ल नाईट’ पार्टी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -