घरमुंबईमुंबईतील प्रमुख रस्तेच नाहीतर गल्लीबोळही स्वच्छ करा - मुख्यमंत्री

मुंबईतील प्रमुख रस्तेच नाहीतर गल्लीबोळही स्वच्छ करा – मुख्यमंत्री

Subscribe

मुंबई : ‘मुंबईतील केवळ प्रमुख रस्ते नव्हे, तर अगदी गल्लीबोळातून त्वरीत स्वच्छता मोहीम राबवावी. तसेच, ‘मुंबईतील स्वच्छतेबाबत कोणतीही हयगय सहन केली जाणार नाही. ही बाब मुंबई पालिकेच्या स्वच्छता विभागाने गांभिर्याने घ्यावी. स्वच्छतेबाबत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी’ असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (1 सप्टेंबर) मुंबई महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त डॉ. आय.एस. चहल यांना दिले. (Clean not only the major roads in Mumbai but also the alleys Chief Minister)

हेही वाचा – गृहमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा; मराठा आंदोलन लाठीचार्जप्रकरणी काँग्रेसची मागणी

- Advertisement -

माझगाव डॉक येथील कार्यक्रमाहून परतत असताना मुख्यमंत्री शिंदे यांना या परिसरात काही ठिकाणी राडारोडा, अस्वच्छता – कचरा आढळला. त्याची दखल घेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्त डॉ. चहल यांना मोबाईलद्वारे संपर्क केला. तसेच या परिसरातीलच नव्हे, तर मुंबईतील सर्व रस्ते, गल्ली बोळ, छोटे रस्ते स्वच्छ करण्याचे आदेश दिले. ‘मुंबईत कुठेही रस्त्यावर कचरा दिसता कामा नये. याची काळजी घ्या. राडारोडा आणि कचरा त्वरीत हटवा. यासाठी पालिकेचे सर्व सहायक आयुक्त, वॉर्ड ऑफिसर, स्वच्छता निरीक्षक- स्वच्छता कर्मचारी अशा सर्व यंत्रणांना कामाला लावा. शहरातील ज्या-ज्या ठिकाणी भिंतींवर सुशोभिकरण करण्याचे काम अपूर्ण आहे, ते त्वरीत पूर्ण करा,’ अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.

माझगाव येथील अस्वच्छतेबाबत अधिकाऱ्यावर कारवाईचा बडगा

मुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशाची गंभीर दखल घेऊन पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी, माझगाव डॉक परिसरातील अस्वच्छता प्रकरणी तेथील संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. तसेच येत्या सात दिवसांमध्ये मुंबईतील सर्व वॉर्ड आणि त्यांचा परिसर, सर्व समुद्र किनारे यांची स्वच्छता युद्ध पातळीवर हाती घेण्यात येईल, असेही आश्वासन चहल यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.

- Advertisement -

हेही वाचा – Jalna Maratha protesters Lathi charge : वाहत्या गंगेत हात धुऊ नका; फडणवीसांचा विरोधकांना इशारा

दररोज दोन तास भेटी द्या, स्वच्छता राखा अन्यथा कठोर कारवाई

मुंबईतील सर्व प्रमुख परिसर व रस्त्यांप्रमाणेच इतर सर्व लहान-सहान रस्ते आणि गल्लीबोळामध्ये देखील स्वच्छतेची कार्यवाही झाली पाहिजे. त्यासाठी सर्व सहआयुक्त, उपआयुक्त, विभाग कार्यालयांचे सहायक आयुक्त त्याचप्रमाणे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी दररोज सकाळ सत्रात एक तास व सायंकाळ सत्रात एक तास याप्रमाणे एकूण दोन तास प्रत्यक्ष क्षेत्रीय भेटी द्याव्यात. तसेच, रस्त्यावर इतरत्र कुठेही कचरा दिसल्यास त्वरित हटविण्यात येऊन स्वच्छता राखावी. तसेच स्वच्छतेची कार्यवाही नियमितपणे होईल, याची दक्षता घ्यावी अन्यथा कठोर कार्यवाही करण्यात येईल, असे सक्त आदेश पालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल चहल यांनी अधिकारी, अभियंते आदींना दिले आहेत.

आयुक्तांनी घेतली तातडीची बैठक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील स्वच्छतेबाबत आयुक्त चहल यांना खडेबोल सुनावले व कारवाईबाबत आदेशीत केल्याने आयुक्त चहल हे तत्काळ चांगलेच कामाला लागले. मुंबईतील घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छता तसेच अनधिकृत बॅनर्स, पोस्टर्स, होर्डिंग्ज यावरील कारवाई संदर्भात आढावा घेण्यासाठी आयुक्त चहल यांनी शुक्रवारी तातडीने बैठक घेतली. अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्यासह सर्व संबंधित सहआयुक्त, उपआयुक्त, सहायक आयुक्त, संबंधित इतर अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

हेही वाचा – गृहमंत्र्यांच्या आदेशाशिवाय…; संजय राऊतांनी मोदींसह राज्य सरकारवर केला हल्लाबोल

अनधिकृत बॅनर्स, पोस्टर्स, होर्डिंग्ज हटविण्याची विशेष मोहीम

मुंबईत आढळणारे सर्व अनधिकृत बॅनर्स, पोस्टर्स, होर्डिंग्ज हटविण्यासाठी विशेष मोहीम हाती घ्यावी व ते त्वरित हटवावे, असे आदेशही आयुक्तांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. नागरिकांना स्वच्छ, सुंदर व सुखद मुंबईचा अनुभव आला पाहिजे, हे प्रशासनाचे प्रथम कर्तव्य आहे, याचे भान ठेवून नियमितपणे ही सर्व कामे करावीत, असे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -